झी मराठी वरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. कुशल हा उत्तम अभिनेता तर आहेच, पण अभिनयाबरोबरच तो एक चांगला लेखकही आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. याचं कारण सोशल मीडियावर त्याच्या पोस्ट. तो सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो कधी त्याच्या आयुष्यातील दैनंदिन अपडेट देत असतो. तसेच तो कधी त्याच्या आगामी प्रोजेक्ट बद्दलही माहिती देत असतो. अशातच त्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून त्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. (Kushal Badrike On Instagram)
कुशलचा सुयनाबरोबर प्रेमविवाह झाला असून त्यांच्यातील बॉण्ड हा खूपच चांगला आहे. त्यांच्यातील हा खास बॉण्ड अनेकदा त्यांनी सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे. कुशल आपल्या पत्नीबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. तसेच या फोटोखाली त्याच्या खास शैलीत कॅप्शनही लिहितो. त्याच्या या कॅप्शनमुळे चाहत्यांसह साऱ्यांचे लक्ष वेधून घेतो. अशातच त्याने पत्नीसाठी एक खास शायरी म्हटली आहे. याचा खास व्हिडीओ त्याची पत्नी सुनयना इन्स्टाग्रामद्वारे शेअर केला आहे.
आणखी वाचा – लग्नानंतर प्रसाद जवादेची छोट्या पडद्यावर एण्ट्री, मालिकेचा प्रोमो समोर, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
या व्हिडीओमध्ये कुशलने मजेशीर अंदाजात सुनयनासाठी ही शायरी म्हटली असल्याचे दिसत आहे. यात तो असं म्हणतो की, “में सोचता हूँ हर बार, की तुम्हें अच्छा लगे कुछ ऐसा कर जाऊं, में कुछ भी कर जाऊं, तुम्हें अच्छा नहीं लगता, इससे अच्छा में मर जाऊं.” त्याच्या या शायरीनंतर कुशल व पत्नी सुनयना दोघेही हसायला लागतात. तसेच व्हिडीओखाली अनेक नेटकऱ्यांनीहे या व्हिडीओखाली कमेंट्सद्वारे हसण्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान, सुनयनाने शेअर केलेल्या या व्हिडीओला अनेकांनी लाईक्स् व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर पत्नीने हा व्हिडीओ शेअर केल्यामुळे कुशलनेही या व्हिडीओखाली “यूँ किसी दीवाने शायर को बाज़ार करना अच्छा नहीं जानेंजाँ” असं म्हणत उत्तर दिलं आहे. तसेच अनेक नेटकऱ्यांनी “क्या बात है, खूप छान, तुमची शायरी आवडली” असं म्हणत त्याच्या शायरीचे कौतुक केले आहे.