शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नम्रता संभेराव-मुक्ता बर्वेची जुगलबंदी, मायराची झलक, कामवाली बाई अन्…; ‘नाच गं घुमा’चा धमाकेदार ट्रेलर, प्रेक्षकांची भरभरुन पसंती

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 17, 2024 | 12:49 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
nach ga ghuma trailer launch

नम्रता संभेराव-मुक्ता बर्वेची जुगलबंदी, मायराची झलक, कामवाली बाई अन्...; 'नाच गं घुमा'चा धमाकेदार ट्रेलर, प्रेक्षकांची भरभरुन पसंती

सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आशयघन चित्रपटांची निर्मिती होत आहे. त्यामध्ये निर्माता परेश मोकाशी हे असे चित्रपट करण्यामध्ये आघाडीवर आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा ‘नाच ग घुमा’चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 1 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या धमाल कॉमेडी ट्रेलरने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमधून मध्यम वर्गीय महिलेची संसारातील तारेवरची कसरत आणि त्याला मोलकरणीची मिळणारी मदत हे विनोदी पद्धतीने मांडण्यात आले आहे. (Nach Ga Ghuma movie trailer)

‘नाच ग घुमा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून याला प्रेक्षकांची खूपच पसंती मिळाली आहे. या ट्रेलरमध्ये मुक्ता बर्वे, सारंग साठ्ये, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत व बालकलाकार म्हणून मायरा वायकुळ ही कलाकार मंडळी भूमिका साकारताना दिसणार आहेत.

आणखी वाचा- नेत्राने वध केल्यानंतर विरोचक पुन्हा जिवंत, अमर असल्याचं वरदान, युद्धात पहिला मृत्यू अद्वैतचा होणार का?

या ट्रेलरमध्ये चित्रपटाची कथा मुक्ता व नम्रता यांच्याभोवती फिरत आहे. मुक्ता एक घर व नोकरी सांभाळणारी महिला असून नम्रताने मोलकरणीची भूमिका साकारली आहे. यामध्ये दोघींची भांडण, एकमेकींची गरज, तसेच सारंगची विनोदी भूमिका व बालकलाकार म्हणून मायरादेखील वेगळ्याच अंदाजात दिसत आहे. घरी मोलकरीण नसेल तर नोकरि करणाऱ्या महिलेची काय अवस्था होते हे विनोदी अंदाजात पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा – बारावीत नापास झाला अन्…; चित्रपटात शिक्षकाची भूमिका साकारताना सुबोध भावेला आठवला ‘तो’ प्रसंग, म्हणाला, “माझ्या मातोश्री रडतील कारण…”

या चित्रपटाची निर्मिती अभिनेता स्वप्नील जोशी, परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई व तृप्ती पाटील यांनी केली आहे. तसेच या चित्रपटाचे लेखन मधुगंधा कुलकर्णी व परेश मोकाशी यांनी केले आहे. तसेच दिग्दर्शनाची धुराही परेश मोकाशी यांनी सांभाळली आहे. दरम्यान हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहाण्यासारखे आहे. प्रेक्षकही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Tags: marathi moviemovie trailor launchmukta barvenach ga ghuma
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Rubina Dilaik Daughter Incident

सुप्रसिद्ध अभिनेत्री शूटिंगला असताना घरी बाळ बेडवरुन खाली पडलं अन्…; स्वतःच सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाली, "देवाच्या कृपेने…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.