मराठी टेलिव्हिजनच्या सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकारांपैकी एक म्हणजे लोकप्रिय अभिनेत्री विशाखा सुभेदार. तिने ‘फू बाई फू’, ‘कॉमेडीची बुलेच ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यासांरख्या कार्यक्रमातून संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलं. तिने आपल्या विनोदीशैलीचा संपूर्ण महाराष्ट्रात ठसा उमटवला. विनोदी कार्यक्रमाव्यतिरिक्त तिने मालिकांमध्येही कामं केलं आहे. ‘शुभविवाह’ या मालिकेत तिने साकारलेली रागिणी आत्या ही भूमिका विशेष गाजली. तिने साकारलेलं प्रत्येक पात्राला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. पण तिचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्यांनी अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी विविध क्षेत्रात कामंही केली आहेत.(Vishakha subhedar told about her son name)
आकाशवाणीत काम करताना तिने ट्रेनमध्ये ड्रेस विकण्याचाही व्यवसाय केला होता. काही काळ तिने शाळेत डान्सही शिकवले. तेव्हा डान्स हा विशिष्ट विषय नव्हता पण डान्स शिकवण्यासाठी इतर विषयही शिकवावे लागायचे. या सर्व प्रवासात तिने अभिनय क्षेत्रातील वावर काही सोडला नाही. अगदी लहानपणापासून तिला अभिनय क्षेत्राची बरीच आवड होती. विशेष म्हणजे तिच्या मुलाचं नावंही अभिनय आहे. यामागचा एक किस्सा तिने ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला.
‘मज्जाचा अड्डा’ या कार्यक्रमात विशाखाला त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरेच प्रश्न विचारले गेले. यावर त्यांनी दिलखुलासपणे उत्तरं दिली. तिने स्वतःच्या प्रेमकथेचा खूलासा केला. तसंच तिने त्यांच्या मुलाचं नाव अभिनय का ठेवलस असा प्रश्न केला होता. तु अभिनय क्षेत्रात असल्यामुळेच मुलाच नाव हे ठेवलस का?
त्यावर उत्तर देताना तिने सांगितलं की, “मी अभिनय क्षेत्रात आले म्हणून मी त्यांच नाव अभिनय ठेवलं नाही. तर मी नालंदा नृत्यकला महाविद्यालयात शिकत असतानाच त्याचं नावं ठरवलं होतं. मला मुलगा झाला तर अभिनय व मुलगी झाली तर यामिनी ही नावं मी अगोदरचं ठरवली होती. या मागचं कारण असं की रंगपीठ म्हणजेच रंगमंच्याच्या चौथ्या विंगला यामिनी म्हणतात. हे माझ्या अभ्यासात आलं होतं आणि हे नाव मला खूप आवडायचं. तर अभिनय म्हणजे आपल्या वंशाचा दिवा पुढे नेणारा मुलगा. हे लॉजिक माझं आधीपासूनच ठरलेलं होतं त्यामुळे माझ्या मुलाचं नाव हे ठेवलं”, असं म्हणत त्यांनी मुलांच्या नावांचा किस्सा सांगितला.