बॉलिवूड स्टार शाहरुख खान व दिग्दर्शक अॅटली यांचा ‘जवान’ चित्रपट ७ सप्टेंबरला प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक रेकॉर्ड बनवत आहे. चित्रपटाने अवघ्या ८ दिवसांत एकूण ३०० कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला आहे. चित्रपटाला मिळालेल्या यशानिमित्त मुंबईत खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चित्रपटातील संपूर्ण कलाकारांनी हजेरी लावली होती. यादरम्यान, झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान चित्रपटातील सहकलाकार प्रियमणीने दिग्दर्शक अॅटलीने आपली फसवणूक केल्याचा खुलासा केला आहे. (Jawan Actress said director cheated in Movie)
‘जवान’ चित्रपटात प्रियमणीने शाहरुखच्या गर्ल्स गॅंगमधील सदस्य असलेल्या लक्ष्मीची भूमिका साकारली आहे. तिच्या भूमिकेचे अन्य भूमिकांप्रमाणे कौतुकदेखील झाले आहे. पण तिने नुकताच एक खुलासा केला आहे, की शाहरुखच्या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता थलपती विजय दिसणार असून त्याने विजयसोबतच्या सीनचे आश्वासन दिले होते. मात्र विजय यात नसल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे अभिनेत्रीने सांगितले आहे. खरंतर, विजय ‘जवान’मध्ये छोटी भूमिका करणार असल्याच्या चर्चा झाली होती. मात्र, चित्रपट प्रदर्शनानंतर ही अफवा खोटी ठरली.
हे देखील वाचा – प्राजक्ता माळीने फार्महाऊससाठी खर्च केले लाखो रुपये, म्हणाली, “दुनिया गेली तेल लावत पण…”
न्यूज १८ च्या वृत्तानुसार, अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले की, अॅटलीने तिला चित्रपटातील विजयच्या कॅमिओबद्दल सांगितले होते. यामुळे उत्साहित होऊन तिने विजयसोबत काही सीन करण्याची मागणी केली, तेव्हा दिग्दर्शकाने होकार दिला. मात्र, शूटिंगदरम्यान विजय सेटवर न दिसल्याने अभिनेत्री निराश झाली होती. तेव्हा ती गमतीत म्हणाली की, अॅटलीने आपल्यासोबत चाल खेळली आणि आपली फसवणूक केली.
हे देखील वाचा – महाविद्यालयात असतानाच विशाखा सुभेदारने ठरवली होती स्वतःच्या मुलांची नावं, म्हणाली, “वंशाचा दिवा पुढे…”
‘जवान’मध्ये शाहरुखसह अभिनेत्री नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोव्हर, रिद्धी डोगरा, संजीता भट्टाचार्य, गिरीजा ओक, लहर खान यांच्यासह अनेक कलाकार मुख्य भूमिकेत दिसले आहेत. याचबरोबर दीपिका पादुकोण आणि संजय दत्त हे पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकले आहे.