रविवार, जून 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रम घेणार प्रेक्षकांचा निरोप, अवधूत गुप्तेने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 15, 2023 | 12:59 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
khupte tithe gupte show going off

khupte tithe gupte show going off

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांची बरीच पसंती मिळत आहे. गायक, संगीतकार व दिग्दर्शक म्हणून दिसणारा अवधूत गुप्ते हा या कार्यक्रमात सूत्रसंचालनाची जबाबदारी घेताना दिसतो. त्याच्या या कार्यक्रमातील वेगळ्या अंदाजामुळे कार्यक्रम प्रेक्षकांच्या बराच पसंतीस पडत आहे. या कार्यक्रमात  बऱ्याच मोठ्या व्यक्तिमत्त्वांनी हजेरी लावली. राजकारण्यांपासून ते कलाकारांपर्यंत आलेल्या सगळ्यांना विविध प्रश्न विचारत अवधूतने गुपित शोधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या कार्यक्रमात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या गुपितांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना सुरुवातीपासून होती. यापूर्वीच्या दोन पर्वांना प्रेक्षकांचा बराच प्रतिसाद मिळाला. तिसऱ्या पर्वालाही प्रेक्षकांची बरीच पसंती मिळत आहे. पण आता या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा जवळ आला आहे. लवकरच हा कार्यक्रमा प्रेक्षकांचा निरोप घेणार असून याबद्दल अवधूतने पोस्ट करत माहिती दिली. (khupte tithe gupte show going off)

अवधूतने नुकताच एक व्हिडीओ शेअर करत कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं सांगितलं. शेअर केलेल्या व्हिडीओत तो मेकअप करताना दिसत आहे. त्यानंतर त्याने पूजा केली, नारळ फोडला. यावेळी त्याच्याबरोबर या कार्यक्रमातील बॅकस्टेज मंडळीही दिसत आहे. व्हिडीओत तो शेवटच्या भागाच्या अँकरिंगची तयारी करताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Avadhoot???? Gupte???? (@avadhoot_gupte)

आणखी वाचा – “आपल्या घरातलं माणूस…”, अडीच वर्षानंतर मालिकेमध्ये परतल्यानंतर तेजश्री प्रधानची पोस्ट, म्हणाली, “तुमच्यातलं कोणीतरी…”

अवधूतने हा व्हिडिओ शेअर करत लिहीलं, ‘थोडे विसरावे लागते… आठवण्यासाठी …दूर जावे लागते पुन्हा भेटण्यासाठी! ह्या पर्वाचा शेवटचा भाग… येत्या रविवारी!’ ,असं कॅप्शन देत त्यांने या कार्यक्रमातील सर्व बॅकस्टेज मंडळींना टॅग केलं आहे. येत्या रविवारी १७ सप्टेंबरला या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. या पर्वाची सुरुवात ४ जूनला झाली होती.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – “तुझ्याशिवाय हे घर…”, अर्जुन कपूरच्या पाळीव श्वानाचं निधन, भावुक होत म्हणाला, “मी तुझ्याशिवाय…”

कार्यक्रमात विविध मंडळी हजेरी लावली. राज ठाकरे, नारायण राणे, संजय राऊत, उर्मिला मातोंडकर, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, डॉ. अमोल कोल्हे यांसारख्या राजकारणीयांनी तर श्रेयस तळपदे, सई ताम्हणकर, वंदना गुप्ते, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, अमृता खानविलकर यांसारख्या कालाकार मंडळींनी हजेरी लावली. आता शेवट्च्या भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे सहभागी होणार आहेत.  

Tags: avdhoot guptekhupte tithe gupte showlast episodezee marathi
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Does Coffee Cause Dehydration
Entertainment

कॉफी प्यायल्याने Dehydration कमी होते का?, मोठा गैरसमज होणार दूर, वाचा सविस्तर

जून 4, 2026 | 12:00 pm
Next Post
Akshay Kumar share a Photo

"…आणि माझ्या आई-वडिलांची इच्छा पूर्ण झाली", असं का म्हणाला अक्षय कुमार?, शेअर केलेली पोस्ट चर्चेत

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.