शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“नवऱ्यालाच आडवं पाडते”, असं का बोलली विशाखा सुभेदार?, ‘त्या’ दिवसांचा उल्लेख करत म्हणाली, “चकणा म्हणून…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 25, 2023 | 2:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Vishakha subhedar on her husband

Vishakha subhedar on her husband

विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे विशाखा सुभेदार. मराठी मालिका, चित्रपट, नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये सध्या त्या काम करत आहेत. कलाक्षेत्रात काम करत असताना खासगी आयुष्यात मात्र विशाखाला स्वतःला फारसा वेळ देता येत नाही. कोणत्याही सणांनाही ती तिच्या कामामध्ये व्यग्र असते. याची विशाखाला खंत वाटते. दिवाळी सण जवळ येत असताना तिने काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

कलाकारांना कामामुळे सण कुटुंबासह मनाप्रमाणे साजरे करता येत नाहीत. विशाखाचंही अगदी तसंच आहे. तरीही वेळात वेळ काढत ती कुटुंबियांबरोबर राहण्याचा प्रयत्न करते. याचबाबत ‘इट्स मज्जा’बरोबर संवाद साधताना तिने काही आठवणी सांगितल्या. तसेच दिवाळी पाडव्याबाबतही भाष्य केलं. विशाखा म्हणाली, “मला माझ्या नवऱ्याने दिवाळी पाडव्याला एक ड्रेस घेतला होता. त्यानंतर काही वर्ष आमचा पाडवा छान झाला”.

आणखी वाचा – कार्तिकी गायकवाडच्या ताफ्यात आणखी एका आलिशान कारची भर, कारची किंमत आहे इतकी

“सुरुवातीला या क्षेत्रामध्ये खूप स्ट्रगल होतं. पैसे वगैरे कसे कमवायचे याबाबतही प्रश्न होता. नवीन लग्न झाल्यावर नंदा घरी येतात तेव्हा असं वाटतं की, आपल्याकडून त्यांना काही द्यावं. त्यामुळे त्यांच्यासाठी अधिक गिफ्ट्स तयार केले. माझे अनेक पाडवे मी सेलिब्रेट केलेच नाहीत. आपल्यासाठी गिफ्ट वगैरे घेणं सगळं ठिक आहे. पैसा येईल तेव्हा आपण आपल्यासाठी गिफ्ट खरेदी करुया असं मी ठरवलेलं. एका पाडव्याला नवऱ्याने मला सोन्याचे कानातले दिले”.

आणखी वाचा – “हेच पाहायचं राहिलं होतं”, ‘आई कुठे…’ अरुंधती होणार आई? नवा प्रोमो पाहून नेटकरी भडकले, म्हणाले, “आशुतोष तर आधीच…”

View this post on Instagram

A post shared by Vishakha Subhedar (@subhedarvishakha)

“काही पाडव्याचे क्षण माझ्या लक्षात आहेत. नवऱ्यासाठी अनेक पाडवे शांतच होते. कारण खिसा, दिवाळी, दिवाळ निघणं हे कायम होतंच. पण आता पाडवा म्हटलं तर नवऱ्याला आडवं पाडायचं, त्याचा खिसा रिकामा करायचा हे माझं सुरुच आहे. मला सण साजरे करायला फार कमी वेळ मिळतो”. शिवाय विशाखा दिवाळी फराळाबाबत म्हणाली, “दिवाळीला फराळ पण इतर दिवशी तेच पदार्थ चकणा म्हणून असतात”. वेळ मिळेल तसं विशाखा दिवाळीचा फराळही घरीच तयार करते.

Tags: entertainment newsmarathi actressmarathi serialvishakha subhdar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Prajaktta mali share a post with nitin gadkari

“तू भाजपामध्येच जा”, नागपूरमधील नितीन गडकरींच्या घरी पोहोचली प्राजक्ता माळी, राजकीय व्यक्तींशी भेटीगाठी वाढल्यानंतर नेटकऱ्यांच्या कमेंट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.