बुधवार, जून 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तू भाजपामध्येच जा”, नागपूरमधील नितीन गडकरींच्या घरी पोहोचली प्राजक्ता माळी, राजकीय व्यक्तींशी भेटीगाठी वाढल्यानंतर नेटकऱ्यांच्या कमेंट

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 25, 2023 | 2:17 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prajaktta mali share a post with nitin gadkari

Prajaktta mali share a post with nitin gadkari

मराठी सिनेसृष्टीत अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत, ज्यांनी छोट्या पडद्यावरून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे आपल्या अभिनयाच्या जोरावर सगळ्यांची मनं जिंकली. त्यापैकी एक म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ताने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सध्या तिचे बऱ्याच नेते मंडळींसह भेटीगाठी वाढल्या आहेत. नुकतीच ती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरींनाही भेटली होती. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यामुळे प्राजक्ता लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. अशातच तिने पुन्हा एकदा एक पोस्ट शेअर केली आहे. नुकतीच तिने केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. (Prajaktta mali share a post with nitin gadkari)

प्राजक्ताने नितीन गडकरी यांच्याबरोबरच्या भेटीचे फोटो सध्या साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. त्यांची नागपूरला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट झाली. त्यावेळचे फोटो तिने शेअर केले आहेत. त्याला कॅप्शन देत प्राजक्ता लिहीते,  ‘मी आणि केंद्रिय मंत्री नितीनजी नागपूरात एका कार्यक्रमानिमित्त एका मंचावर उपस्थित राहण्याचा योग जुळून येता येता राहिला. आयोजकांना म्हटलं, सहज शक्य झालं तर मला त्यांना भेटायला खूप आवडेल आणि त्यांनी नितीनजींनी तात्काळ वेळ दिला.नवमीला नितीजींच्या निवासस्थानी ही ‘ग्रेट भेट’ झाली. त्यामुळे सबंध परिवारालाही भेटता आलं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा, माझे आगामी प्रोजेक्ट, श्री श्री रविशंकरजी, प्राजक्तराज, समृद्धी महामार्ग’ अशा विविध विषयांवर अर्ध्या तासाहून अधिक वेळ गप्पा झाल्या. ‘श्री श्रींचं माझ्यावर पुत्रवत प्रेम आहे आणि आम्ही तुमची ‘हास्यजत्रा’ रोज बघतो’ हे ऐकून मला विशेष आनंद झाला’.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

आणखी वाचा – Video : ‘जीभ वापरून बाण …’, रावण दहनाला गेलेल्या कंगन राणौतकडून घडली चूक, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

प्राजक्ता पुढे लिहीते, ‘त्यांनी निघताना त्यांच्या घरच्या देवीचं दर्शन घ्यायला लावलं. त्यांच्या कामावर लिहीली गेलेली ८-९ पुस्तकं दिली. नैसर्गिक कापसापासून बनवलेली खादी साडी दिली. जी मी लगेच दुसऱ्या दिवशी विजयादशमी उत्सवात नेसली. आयूष्यभर स्मरणात राहील अशा या भेटीसाठी वेळ दिल्याबद्दल नितीनजींचे मनापासून आभार’, असं लिहीत तिने नितीन गडकरी यांच्याबरोबर व कुटुंबसह घालवलेल्या क्षणांचा अनुभव सांगितला.

आणखी वाचा – “तुझ्या शारीरिक वेदना…”, आईच्या निधनानंतर सुप्रिया पाठारेंची भावुक पोस्ट; म्हणाल्या, “त्या धक्क्यातून…”

सध्या हे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत. एका नेटकऱ्याने लिहीलं, ‘त्यापेक्षा सरळ भाजपात जा. हे हळू हळू लांगुलचालन कशाला? अभिनेत्री कितीही लोकप्रिय असली तरीही महाराष्ट्रात तेवढ्यावर मतं मिळत नाहीत. तू जर चुकीच्या पक्षात असलीस, तर माझं मत तुला कधीच मिळणार नाही. महाराष्ट्र सुज्ञ आहे’, असं लिहीत त्याने महाराष्ट्राच्या राजकारणात सामील होण्यापूर्वी दहावेळा विचार कर असं खडसावलं आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने कमेंट करत लिहीलं, ‘प्राजक्ता तू खूप गोड दिसतेस  आणि तुला राजकारणात पाहण्याची आशा आहे. ते चालू ठेवू, चांगलं काम कर’, असं लिहीत प्राजक्ताला राजकारणात पाहायला आवडेल असं मत मांडलं आहे.

Tags: central ministerexperience of meetingmarathi actressnitin gadkariprajaktta mali
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Swanandi Tikekar new home photos
Entertainment

तीन वर्षाचं स्वप्न…; मराठी सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतलं नवं घर, बाल्कनीत पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

जून 1, 2026 | 12:00 pm
Suman Kalyanpur Death
Entertainment

“आजकल तेरे मेरे प्यार के” गाण्याचा आवाज हरपला, सुप्रसिद्ध गायिकेचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन

जून 1, 2026 | 9:55 am
Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Next Post
Karanveer Mehra and Nidhi Seth divorce

पहिलं लग्न दोन वर्षामध्ये मोडलं, आता दुसऱ्या पत्नीबरोबरही सुप्रसिद्ध अभिनेत्याने घेतला घटस्फोट, दोन वर्षांपूर्वीच विवाह झाला होता अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.