शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : भाचीबरोबर विशाखा सुभेदारांचा बेभान होऊन डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरीही हैराण, कौतुकाचा वर्षाव

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 4, 2024 | 1:56 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actress Vishakha Subhedar dancing with her niece video shared on social media netizens appreciated

विशाखा सुभेदार यांचा भाचीबरोबर भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक, म्हणाले...

नाटक, मालिका, चित्रपट व रिॲलिटी शोज यासारख्या अनेक माध्यमांतून घराघरांत लोकप्रिय असलेल्या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. ‘फु बाई फू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यांसारख्या अनेक विनोदी कार्यक्रमांतून विशाखा यांनी त्यांच्या विनोदी अभिनयाची छाप सोडली आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणाऱ्या विशाखा सुभेदार या सोशल मीडियावरही तितक्याच सक्रीय असतात. सोशल मीडियावर त्या आपल्या अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अशातच विशाखा यांनी नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ज्यामध्ये विशाखा सुभेदार त्यांच्या भाचीबरोबर जबरदस्त डान्स करत आहेत. (Vishakha Subhedar Dance)

विशाखा सुभेदार यांनी डान्स करतानाचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री भाचीबरोबर सलमान खानच्या ‘ट्यूबलाइट’ चित्रपटातील ‘नाच मेरी जान’ गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहेत. “माझ्या लाडक्या भाचीबरोबर मस्ती”, असं कॅप्शन लिहित विशाखा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये दोघींच्या जबरदस्त डान्ससह हावभावाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर अनेकांनी या डान्समधील त्यांच्या हावभावाचे विशेष कौतुक केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Vishakha Subhedar (@subhedarvishakha)

आणखी वाचा – The Great Indian Kapil Show मधील विनोदी अभिनेत्यावर प्रेक्षक नाराज, तृप्ती डिमरीला विचारलं असं काही…; नेटकरी म्हणाले “हाच प्रश्न रणबीरला…”

“खूप सुंदर भाव, दोघी खूप सुंदर नाचत आहात, देव तुम्हा दोघांनाही आशीर्वाद देवो”, “तुम्हा दोघींना नाचताना आणि अशा छान आठवणी एकत्र करताना बघायला आवडेल”, “खूप छान”, “खूप सुंदर” अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी विशाखा यांच्याबरोबर त्यांच्या भाचीच्या डान्सचे कौतुक केले आहे. तर एका नेटकऱ्याने या व्हिडीओखाली “ही पुढे तुमचा वारसा चालवणार” अशी कमेंट केली आहे. त्यामुळे एकूणच विशाखा यांचा हा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांच्याच चांगलाच पसंतीस पडत आहे. विशाखा यांची राधा ही भाची मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी तिने स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत छोटीशी भूमिका साकारली होती. यानिमित्त विशाखा यांनी खास पोस्टही शेअर केली होती.

आणखी वाचा – प्रसिद्ध दिग्दर्शकाचा धक्कादायक मृत्यू, घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, नेमकं काय झालं?

दरम्यान, ‘फु बाई फू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यासारख्या विनोदी कार्यक्रमांतून विशाखा सुभेदार घराघरात पोहोचल्या आहेत. त्यांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘शुभविवाह’ मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या मालिकेत त्यांची नकारात्मक भूमिका साकारत असून त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

Tags: marathi actressvishakha subhedarVishakha Subhedar dance
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
OTT special movies

ओटीटीवर मनोरंजनाची भरघोस मेजवानी, ११ नवे चित्रपट व वेबसीरिज प्रेक्षकांना अनुभवता येणार, वाचा संपूर्ण यादी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.