नाटक, मालिका, चित्रपट व रिॲलिटी शोज यासारख्या अनेक माध्यमांतून घराघरांत लोकप्रिय असलेल्या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. ‘फु बाई फू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यांसारख्या अनेक विनोदी कार्यक्रमांतून विशाखा यांनी त्यांच्या विनोदी अभिनयाची छाप सोडली आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणाऱ्या विशाखा सुभेदार या सोशल मीडियावरही तितक्याच सक्रीय असतात. सोशल मीडियावर त्या आपल्या अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अशातच विशाखा यांनी नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ज्यामध्ये विशाखा सुभेदार त्यांच्या भाचीबरोबर जबरदस्त डान्स करत आहेत. (Vishakha Subhedar Dance)
विशाखा सुभेदार यांनी डान्स करतानाचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री भाचीबरोबर सलमान खानच्या ‘ट्यूबलाइट’ चित्रपटातील ‘नाच मेरी जान’ गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहेत. “माझ्या लाडक्या भाचीबरोबर मस्ती”, असं कॅप्शन लिहित विशाखा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये दोघींच्या जबरदस्त डान्ससह हावभावाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर अनेकांनी या डान्समधील त्यांच्या हावभावाचे विशेष कौतुक केले आहे.
“खूप सुंदर भाव, दोघी खूप सुंदर नाचत आहात, देव तुम्हा दोघांनाही आशीर्वाद देवो”, “तुम्हा दोघींना नाचताना आणि अशा छान आठवणी एकत्र करताना बघायला आवडेल”, “खूप छान”, “खूप सुंदर” अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी विशाखा यांच्याबरोबर त्यांच्या भाचीच्या डान्सचे कौतुक केले आहे. तर एका नेटकऱ्याने या व्हिडीओखाली “ही पुढे तुमचा वारसा चालवणार” अशी कमेंट केली आहे. त्यामुळे एकूणच विशाखा यांचा हा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांच्याच चांगलाच पसंतीस पडत आहे. विशाखा यांची राधा ही भाची मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी तिने स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत छोटीशी भूमिका साकारली होती. यानिमित्त विशाखा यांनी खास पोस्टही शेअर केली होती.
आणखी वाचा – प्रसिद्ध दिग्दर्शकाचा धक्कादायक मृत्यू, घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, नेमकं काय झालं?
दरम्यान, ‘फु बाई फू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यासारख्या विनोदी कार्यक्रमांतून विशाखा सुभेदार घराघरात पोहोचल्या आहेत. त्यांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘शुभविवाह’ मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या मालिकेत त्यांची नकारात्मक भूमिका साकारत असून त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.