टेलिव्हिजन गाजवल्यानंतर कॉमेडियन कपिल शर्माने अलीकडेच त्याचा मोर्चा ओटीटीकडे वळवला. नेटफ्लिक्सवरील त्याचा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आणि या चर्चेचं कारण म्हणजे या कार्यक्रमावर व कार्यक्रमातील विनोदी कलाकारांवर काही नेटकरी मंडळी नाराज आहेत. त्याचं झालं असं की, कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांचा ‘भूल भुलैया ३’ हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहात दाखल झाला आहे. त्यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून कलाकार या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अशातच या चित्रपटातील कलाकारांनी नुकतीच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ प्रमोशनसाठी हजेरी लावली. (The Great Indian Kapil Show Audience Upset)
यावेळी विनोदी अभिनेता सुनील ग्रोव्हरने अभिनेत्री तृप्ती डिमरीबरोबर केलेल्या संवादामुळे काही नेटकरी मंडळी नाराज झाली आहेत. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या एका सेगमेंटमध्ये सुनील ग्रोव्हरचे पात्र ‘डफली’ तृप्ती डिमरीबरोबर संवाद साधताना दिसले. ‘डफली’ने तिला प्रथम विचारले की, “ही तीच व्यक्ती आहे ना जी ‘ॲनिमल’ चित्रपटात होती?”. यावर तृप्ती म्हणाली “हो ती मीच आहे”. त्यानंतर ‘डफली’ने तिला चित्रपटातील रणबीरबरोबरच्या तिच्या बोल्ड सीन्सबद्दल प्रश्न केला आणि विचारले की, “ते सीन खरे आहेत की खोटे?”.
आणखी वाचा – प्रसिद्ध दिग्दर्शकाचा धक्कादायक मृत्यू, घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, नेमकं काय झालं?
‘डफली’ म्हणाली, “रणबीर कपूरबरोबर तू जे काही केलंस, मला आशा आहे की ते फक्त शूटिंग होते. प्रत्यक्षात असे काही नव्हते, बरोबर?”. यावर तृप्ती मोठ्याने हसली आणि म्हणाली की, “हो ते खोटे आहे”. मग ‘डफली’ आनंदाने उड्या मारू लागला आणि ते मित्र होऊ शकतात म्हणून ओरडायला लागले. त्यांच्यातील हा संवाद उपस्थितांनी एन्जॉय केला. मात्र नेटकरी यावर काहीसे नाराज झाल्याचे पाहायला मिळत आहे. याबद्दल नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.
एका नेटकऱ्याने याबद्दल असं म्हटलं आहे की “हा प्रश्न डफलीने रणबीर कपूरला का नाही विचारला? पण तृप्तीला विचारत आहे”. तर आणखी एकाने “थर्ड क्लास कॉमेडीसाठी स्त्रीला असं अस्वस्थ करणं हे हास्यास्पद आहे?” अशी कमेंट करत प्रश्न विचारला आहे. तर आणखी एकाने “हे खूप वाईट आहे की याला “विनोद” म्हणून संबोधले जात आहे”. तसंच काहींनी हा विनोद तृप्तीने अगदी उत्तम रित्या हातळल्याचे म्हणत तिचे कौतुक केले आहे.