शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बाळानंतर लैंगिक जीवनावर परिणाम?, नैसर्गिकरित्या गरोदर राहिलीस का?”, प्रश्नावर भडकली मराठमोळी अभिनेत्री, म्हणाली, “कोणी कसंही…”

सौरभ जाधवby सौरभ जाधव
ऑगस्ट 28, 2023 | 12:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Urmila Nimbalkar

Urmila Nimbalkar

कलाकार हा त्याच्या अभिनयासाठी प्रामुख्याने ओळखला जातो. परंतु काही कलाकार रुपरी पडद्याव्यतिरिक अनेक सोशल माध्यमांच्या मार्गाने देखील प्रेक्षकांच्या संपर्कात असतात. सध्या अभिनयापासून दूर असली तरीही सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री म्हणजे उर्मिला निंबाळकर. उर्मिला सध्या मनोरंजन सृष्टीपासून काहीशी दूर असली तरीही यु ट्यूबच्या माध्यमातून ती प्रेक्षकांची वेळोवेळी संवाद साधत असते. प्रेक्षकांच्या अनेक प्रश्नांची उत्तर देखील ती अगदी दिलखुलासपणे देते. महिलांनी कसं राहावं, फॅशन संबंधित, आरोग्य संबंधित अशा अनेक गोष्टी उर्मिला यामार्फत प्रेक्षकांशी शेअर करते.(Urmila Nimbalkar)

उर्मिलाने नुकताच आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिला प्रेक्षकांच्या अनेक प्रश्नांचा सामना करावा लागला. या प्रश्नांचं उत्तर देताना उर्मिलाचा राग काहीवेळा अनावर झालेला देखील पाहायला मिळाला. “तुला स्वयंपाक येतो का?”,”बाळ नॅचरली कन्सिव्ह केलंय का?” अशा अनेक प्रश्नांना उर्मिलाने उत्तर दिली आहेत. तुला स्वयंपाक येतो का? या प्रश्नावर उत्तर देत उर्मिला म्हणाली “‘स्त्री ची संपूर्ण लायकीच तिला स्वयंपाक येतो का यावर का ठरवली जाते. मुळात स्वयंपाक येणं ही एक कला असून, काहींकडे ती असते, तर काहींकडे ती नसते. त्याच्यामुळं आपण कोणाबद्दल पूर्वग्रह बांधू नये. माझ्याकडे लाईफस्कील्स आहेत आणि मला उत्तम स्वयंपाक देखील बनवता येतो.”(urmila nimbalkar serials)

View this post on Instagram

A post shared by Urmila| Actor Marathi Youtuber (@urmilanimbalkar)

हे देखील वाचा – ‘सुभेदार’ची चर्चा रंगत असताना अजय पुरकर यांची दाक्षिणात्य चित्रपटात दमदार एण्ट्री, ट्रेलरमध्ये दिसली झलक

Sexual Life आणि उर्मीलाच स्पष्ट उत्तर (Urmila Nimbalkar)

प्रश्न उत्तरांच्या या फेरीत उर्मिलाला “बाळानंतरच्या Sexual लाईफ बद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संयमाने उत्तर देत उर्मिला म्हणाली “आपला चॅनल अनेक लहान मुलं सुद्धा बघतात त्यामुळे मी सविस्तर उत्तर देऊशकत नाही. मात्र या संबंधित योग्य माहितीसाठी तुम्ही तुमच्या गायनॅकोलोजिस्टना भेटा, विचार करा.

गरोदरपणाच्या संदर्भात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नामुळे उर्मिलाचा राग अनावर झाल्याचं देखील पाहायला मिळाला. ‘बाळ नॅचरली कन्सिव्ह केलंय का?’ हा प्रश्न उर्मिलाच्या समोर आल्या नंतर उत्तर देताना उर्मिलाचा पारा काहीसा चडल्याचा दिसला. उर्मिला म्हणाली ” ‘कोणी कसंही गरोदर राहो, काय फरक पडतो. तर या विज्ञानाचा काय फायदा?’ असा प्रश्न उपस्थित करताना उर्मिलानं बाळ बाळ असतं आणि आई ही आई असते. सरतेशेवटी बाळ आणि आई सुखरुप आणि निरोगी असणं हेच महत्त्वाचं”.(urmila nimbalkar talks about sex life)

हे देखील वाचा – ‘चांद्रयान ३’च्या महिला शास्त्रज्ञांचा टिकली, मंगळसूत्र व साडीमधील लूक, फोटो पाहिल्यानंतर कंगना रणौत म्हणते, “भारतातील आघाडीचे…”

या व्हिडिओमध्ये उर्मिलाने अनेक प्रश्नांनी उत्तर समाधानकारक उत्तर दिली आहेत. तसेच काही प्रश्नांची उत्तर देताना उर्मिला काहीशी भावनिक झालेली देखील पाहायला मिळाली.

Tags: entertainment newsurmila nimbalkarurmila nimbalkar talks about sex life
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Avinash Narkar and Aishwarya Narkar

“जो भी होगा, देखा जायेगा,” संतुर जोडी नारकर कपलचा भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, "नारकर साहेब…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.