गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘सुभेदार’ची चर्चा रंगत असताना अजय पुरकर यांची दाक्षिणात्य चित्रपटात दमदार एण्ट्री, ट्रेलरमध्ये दिसली झलक

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑगस्ट 28, 2023 | 11:42 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ajay Purkar debut in South Film Industry

'सुभेदार'ची चर्चा रंगत असताना अजय पुरकर यांची दाक्षिणात्य चित्रपटात दमदार एण्ट्री, ट्रेलरमध्ये दिसली झलक

बॉक्स ऑफिसवर सध्या एकाच चित्रपटाची जोरदार चर्चा आहे, ती म्हणजे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘सुभेदार’ चित्रपटाची. सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचा पराक्रम मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहे. सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या भूमिकेत अभिनेते अजय पुरकर दिसत आहे. या भूमिकेसाठी अजय पुरकर यांनी प्रचंड मेहनत घेतली असून त्यांची ही मेहनत फळाला येत आहे. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Ajay Purkar debut in South Film Industry)

एकीकडे त्यांच्या भूमिकेला व चित्रपटाला प्रतिसाद मिळत असतानाच अजय पुरकर लवकरच एका नव्या चित्रपटात झळकणार आहे. मात्र मराठी किंवा हिंदीत नव्हे, तर दाक्षिणात्य चित्रपटात. अभिनेते अजय पुरकर एका तेलुगू चित्रपटात झळकणार असून या चित्रपटातून ते दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. ‘स्कंद’ असे या चित्रपटाचे नाव आहे, ज्याचे दिग्दर्शन ‘अखंड’ फेम दिग्दर्शक बोयापती श्रीनु यांनी केले आहे.

अभिनेता राम पोट्टीनेनी यात मुख्य भूमिका साकारत असून त्याच्यासह मराठमोळी अभिनेत्री सई मांजरेकर व श्रीलीलासुद्धा असणार आहे. चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये भरपूर ऍक्शनचा भरणा असून अभिनेते अजय पुरकर यांची एक झलकसुद्धा पाहायला मिळाली आहे. या चित्रपटात अजय पुरकर महत्वाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार असून त्यांना या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी त्यांचे चाहते प्रचंड उत्सुक आहे.

हे देखील वाचा – ‘सुभेदार’ चित्रपटाचा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ, दोन दिवसांत कमावले तब्बल इतके कोटी

दरम्यान, चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटप्रसंगी दिग्दर्शक बोयापती श्रीनु यांनी अजय पुरकर यांच्या ‘सुभेदार’ चित्रपटातील भूमिकेचे व चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून तो व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

हे देखील वाचा – Video : परदेशात जाऊन सुव्रत जोशीने खाल्ले किडे, व्हिडिओही केला शेअर, म्हणाला, “किडे खाऊन मी…”

अजय पुरकर हे आजवर अनेक मराठी मालिका व चित्रपटांमध्ये झळकले आहेत. शिवाय, त्यांनी हिंदी चित्रपटांमध्येदेखील काम केले असून त्यांच्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एन्ट्रीची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. (Ajay Purkar in South Film)

Tags: ajay purkarAjay Purkar South FilmSouth Film Industry
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Urmila Nimbalkar

“बाळानंतर लैंगिक जीवनावर परिणाम?, नैसर्गिकरित्या गरोदर राहिलीस का?”, प्रश्नावर भडकली मराठमोळी अभिनेत्री, म्हणाली, “कोणी कसंही…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.