सध्या सर्वत्र लग्नाचा माहोल सुरू आहे. हिंदीसह मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारमंडळी लग्नगाठ बांधत आहेत. प्रसाद-अमृता यांनी पुण्यात अगदी शाही पद्धतीने एकमेकांशी लग्नगाठ बांधली. यानंतर सुरुची-पियुष हे दोघेही विवाहबंधनात अडकले. नुकतेच मुग्धा वैशंपायन हिच्या मोठ्या बहिणीचं लग्नही अगदी साधेपणाने पार पडले. अशातच आता गायक आशिष कुलकर्णी व गायिका-अभिनेत्री स्वानंदी टीकेकर हे दोघेदेखील लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली देत त्यांनी प्रेम जाहीर केलं होतं. यानंतर त्यांच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे. (Ashish Kulkarni On Instagram)
आशिष-स्वानंदी यांच्या कुटुंबियांकडून व मित्रपरिवाराकडून त्यांच्या केळवणाचे आयोजन केले गेले होते. याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अशातच त्यांचा एक नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात आशिष-स्वानंदी यांनी दोघांचा एक सेल्फी फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला असून या फोटोमध्ये दोघेही कमालीचे सुंदर दिसत आहेत. तसेच या फोटोखाली त्यांनी ‘फक्त ६ दिवस बाकी’ असंही म्हटलं आहे. त्यामुळे आशिष-स्वानंदी यांच्या लग्नाविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे.
आशिषने या फोटोबरोबर ‘फक्त ६ दिवस बाकी’ असे म्हटल्याने त्यांच्या लग्नाला आता फक्त काही दिवसच राहिले असल्याचे कळत आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नासाठी कुटुंबीय, मित्रपरिवार व त्यांचे चाहते कमालीचे उत्सुक आहेत. अनेकजण हे दोघे कधी लग्न करणार? याची आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी आशिष-स्वानंदी यांनी ‘आमचं ठरलंय’ म्हणत त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. नंतर काही दिवसांनी अगदी दिमाखात त्यांचा साखरपुडा संपन्न झाला.
दरम्यान, अभिनेत्री स्वानंदी टीकेकर ही ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचली. त्यानंतर ‘अस्सं माहेर नको गं बाई’, ‘अगं अगं सुनबाई…’ या मालिकेत स्वानंदीने मुख्य भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तसेच आशिष कुलकर्णी हा उत्तम गायक आणि गीतकार आहे. तो ‘इंडियन आयडल’च्या गेल्या पर्वात सहभागी झाला होता. या कार्यक्रमातून त्याने अनेक उत्तमोत्तम गाणी गात रसिकश्रोत्यांची मनं जिंकली.