बॉलिवूडमधील कलाकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. विशेषतः ही कलाकार मंडळी रिलेशनशिपमुळे चर्चेत येत असते. असच एक नातं जे कोणापासूनही लपून राहिले नाही ते म्हणजे विवेक ओबेरॉय व ऐश्वर्या राय बच्चन. एकेकाळी दोघेही चर्चेत असायचे. ऐश्वर्या रायचं सलमान खानसह ब्रेकअप झाले होते. त्यादरम्यान अभिनेत्रीचे विवेक ओबेरॉयबरोबरच्या नात्याची बॉलिवूडमध्ये चर्चा होऊ लागली होती. मात्र त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. २००५ साली ते दोघेही वेगळे झाले. त्यानंतर ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनसह लग्न केले. (Suresh Oberoi On Vivek Oberoi and Aishwarya rai)
दरम्यान सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या ‘अॅनिमल’ चित्रपटामुळे या चर्चांना पुन्हा उधाण आलं असल्याचं पाहायला मिळत आहे. या चित्रपटामुळे विवेक ओबेरॉयचे वडील सुरेश ओबेरॉय विशेष चर्चेत आले. दरम्यान सुरेश ओबेरॉय यांनी आपला मुलगा विवेक, ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांच्याबद्दल त्यांना काहीच माहिती नसल्याचा खुलासा केला आहे.
‘लहरें’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेते म्हणाले की, “मला बहुतेक गोष्टी माहितही नव्हत्या. विवेकने मला याबद्दल कधीच सांगितले नाही. रामू म्हणजेच राम गोपाल वर्मा यांनी मला सांगितले आणि त्यांच्या आधी मला कोणीतरी सांगितले होते. तेव्हा मी त्याला असं काही करू नकोस असंही सांगितलं होत” असं ते म्हणाले.
सुरेश ओबेरॉय यांनी सलमान खान व सलीम खानबरोबर असलेल्या नात्याबद्दल खुलासा केला, “मी पूर्वीही आणि आताही विवेकच्या निर्णयाबाबत निवांत असतो. आम्ही एकमेकांसह खूप चांगले वागतो. सलमान खान जेव्हा जेव्हा मला भेटतो तेव्हा तो आदर म्हणून हातातली सिगारेट लपवतो आणि नंतर माझ्याशी बोलतो. मी नेहमी विवेकला सलीमजींचे आशीर्वाद घ्यायला सांगतो. मी स्वतः सलीम भाईंचा आदर करतो. या गोष्टी घडल्या असल्या तरी माझे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत” असंही ते म्हणाले.