मराठी नाटक, मालिका व चित्रपट अशा तीनही माध्यमांत काम प्रेक्षकॅनचे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे. झी मराठी वरील ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेतून ऋतुजा लोकप्रिय झाली. आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी ऋतुजा सोशल मीडियावरदेखील चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर आपले अनेक स्टायलिश फोटो व अनेक ट्रेंडिंग व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. अशातच तिने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. (Rutuja Bagwe On Instagram)
सध्या लग्नसराईचा माहोल सुरू आहे. अनेकजण आपल्या जोडीदारांबरोबर विवाहबंधनात अडकत आहेत. अशातच ऋतुजाच्या चुलत भावाचेही लग्न पार पडले आहे. या लग्नात तिने खूपच एन्जॉय केल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. चुलत भावाचे लग्न असले तरी या लग्नात ऋतुजा भलतीच भाव खाऊन गेली आहे. “माझा चुलत भाऊ विवाहबंधनात अडकत आहे. त्याचवेळी मी” असं म्हणत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती कधी बहिणीबरोबर नाचत आहे, तर कधी लग्नातील जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहे. त्याचबरोबर लग्नात काही लहान मुलांबरोबरदेखील एन्जॉय करताना दिसत आहे. तसेच या व्हिडीओखाली नाचा, खा आणि आनंदी राहा” असं म्हटलं आहे. त्याचबरोबर ‘सिंगल लाईफ’ असा हॅशटॅगदेखील लिहिला आहे.
आणखी वाचा – दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांच्या ऐतिहासिक ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाची घोषणा, पोस्टरने वेधलं लक्ष
ऋतुजाने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली अनेक नेटकऱ्यांनी त्यांना हा व्हिडीओ आवडल्याचे म्हटले आहे. मराठीतील कलाकार मंडळींसह तिच्या अनेक चाहत्यांनी या व्हिडीओखाली कमेंट केली आहे. अभिनेत्री क्रांती रेडकरने “किती सुंदर दिसत आहेस?” असं म्हणत ऋतुजाचं कौतुक केले आहे. त्याचबरोबर या व्हिडीओखाली अनेक नेटकऱ्यांनीहे ऋतुजाच्या लूकचे कौतुक करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत.
दरम्यान, ऋतुजाचे नुकतेच ‘लंडन मिसळ’ व ‘सोंग्या’ हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. ‘लंडन मिसळ’ या चित्रपटात लंडनमध्ये मिसळचं हॉटेल उभं करण्याचे वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करणाऱ्या दोन बहिणींची कथा सांगण्यात आली आहे. तर ‘सोंग्या’ चित्रपटातून एक तरुणी तिचं प्रेम, स्वप्न व इच्छा हे सर्व मोडून एक नवा संघर्ष सुरू करते आणि या संघर्षाची कथा दाखवण्यात आली आहे.