शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

स्वानंदी टिकेकरची लग्नाची जोरदार तयारी, होणाऱ्या नवऱ्याने खास फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद, म्हणाला, “सहा दिवस…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 19, 2023 | 2:31 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
marathi actress singer swanandi tikekar and ashish kulkarni shared photo with using 6 days to go hashtag

स्वानंदी टिकेकरची लग्नाची जोरदार तयारी, होणाऱ्या नवऱ्याने खास फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद, म्हणाला, "सहा दिवस…"

सध्या सर्वत्र लग्नाचा माहोल सुरू आहे. हिंदीसह मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारमंडळी लग्नगाठ बांधत आहेत. प्रसाद-अमृता यांनी पुण्यात अगदी शाही पद्धतीने एकमेकांशी लग्नगाठ बांधली. यानंतर सुरुची-पियुष हे दोघेही विवाहबंधनात अडकले. नुकतेच मुग्धा वैशंपायन हिच्या मोठ्या बहिणीचं लग्नही अगदी साधेपणाने पार पडले. अशातच आता गायक आशिष कुलकर्णी व गायिका-अभिनेत्री स्वानंदी टीकेकर हे दोघेदेखील लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली देत त्यांनी प्रेम जाहीर केलं होतं. यानंतर त्यांच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे.  (Ashish Kulkarni On Instagram)

आशिष-स्वानंदी यांच्या कुटुंबियांकडून व मित्रपरिवाराकडून त्यांच्या केळवणाचे आयोजन केले गेले होते. याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अशातच त्यांचा एक नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात आशिष-स्वानंदी यांनी दोघांचा एक सेल्फी फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला असून या फोटोमध्ये दोघेही कमालीचे सुंदर दिसत आहेत. तसेच या फोटोखाली त्यांनी ‘फक्त ६ दिवस बाकी’ असंही म्हटलं आहे. त्यामुळे आशिष-स्वानंदी यांच्या लग्नाविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे.  

आणखी वाचा – काजोलची आई ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा, रुग्णालयामधून घरी आणलं अन्…; नेमकं काय घडलं होतं?

आशिषने या फोटोबरोबर ‘फक्त ६ दिवस बाकी’ असे म्हटल्याने त्यांच्या लग्नाला आता फक्त काही दिवसच राहिले असल्याचे कळत आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नासाठी कुटुंबीय, मित्रपरिवार व त्यांचे चाहते कमालीचे उत्सुक आहेत. अनेकजण हे दोघे कधी लग्न करणार? याची आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी आशिष-स्वानंदी यांनी ‘आमचं ठरलंय’ म्हणत त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. नंतर काही दिवसांनी अगदी दिमाखात त्यांचा साखरपुडा संपन्न झाला.

आणखी वाचा – Video : भावाच्या लग्नामध्ये बहिणीसह हॉलच्या गेटवरच नाचली ऋतुजा बागवे, सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं अन्…; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, अभिनेत्री स्वानंदी टीकेकर ही ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचली. त्यानंतर ‘अस्सं माहेर नको गं बाई’, ‘अगं अगं सुनबाई…’ या मालिकेत स्वानंदीने मुख्य भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तसेच आशिष कुलकर्णी हा उत्तम गायक आणि गीतकार आहे. तो ‘इंडियन आयडल’च्या गेल्या पर्वात सहभागी झाला होता. या कार्यक्रमातून त्याने अनेक उत्तमोत्तम गाणी गात रसिकश्रोत्यांची मनं जिंकली.   

Tags: ashish kulkarnientertainmententertainment newsmarathi entertainmentMarathi newsswananadi tikekarswanandi and ashishSwanandi and Ashish wedding
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Next Post
Suresh Oberoi On Vivek Oberoi and Aishwarya rai

"तो हातातली सिगारेट…", विवेक ओबेरॉयच्या वडिलांचं सलमान खानबाबत भाष्य, लेकाचं ऐश्वर्यासह असलेल्या रिलेशनशिपवर म्हणाले, "त्याला सांगितलं की…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.