शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मेकअप करुन अन्नपूर्णांच्या मध्येच जबरदस्ती घुसून…”, आषाढी वारीवरुन शुभांगी गोखलेंची पोस्ट, नेटकऱ्यांनीही दिला पाठिंबा

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 26, 2025 | 1:25 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Shubhangi Gokhale on ashadhi wari

“मेकअप करुन अन्नपूर्णांच्या मध्येच जबरदस्ती घुसून...”, आषाढी वारीवरुन शुभांगी गोखलेंची पोस्ट, नेटकऱ्यांनीही दिला पाठिंबा

आषाढी वारीमध्ये वारकरी मंडळी मग्न झाले आहेत. माऊलींच्या नामस्मरणात वारकरी दंग असतानाच भक्तीमय वातावरण अगदी अनुभवण्यासारखं आहे. ही पायवारी राज्याच्या विविध भागांमधून जात असताना पालखीचं दर्शन घेण्यासाठी हजारो लोक गर्दी करतात. कित्येक वर्षांपासून आषाढी वारीची परंपरा सुरु आहे. वारकरी अगदी दंग होऊन पांडुरंगाची सेवा करतात. मात्र या सोशल मीडियाच्या काळात वारीमध्ये उगाच वाढणारी गर्दी, देखावा अधिक पाहायला मिळतो. रिल, शूटसाठी गर्दी करणारेही हजारो आहेत. याचबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी सोशल मीडियाद्वार पोस्ट करत सत्य परिस्थिती मांडली. (Shubhangi Gokhale on ashadhi wari)

वारीमध्ये वारकऱ्यांना खाण्याचे पाकिट, पाणी वाटताना बरीच मंडळी दिसतात. फोटो काढतात, रिल काढतात, मेकअप करुन वारीत महिलांना जेवण करण्यास मदत करतात. हे सगळं कशासाठी? असा सवाल शुभांगी यांनी केला. फेसबुक पोस्ट शेअर करत शुभांगी म्हणाल्या, “खूप वर्षांपासून मनात येत राहतं.  वारी वर्षानुवर्ष शांतपणे, शिस्तबद्ध चाललेली असताना तिथे मोठाल्या गाड्या नेऊन खिचडीची पाकिटं घेऊन जा, केळी वाटायची, मेकअप करुन त्या अन्नपूर्णांच्यामध्ये जबरदस्तीनी घुसून भाकऱ्या भाजायच्या. असे अनेक प्रकार करुन त्या भक्तिपूर्ण वातावरणाचा विचका करायचा. कशासाठी?. काही दिवसांत “काजवा महोत्सव” नामक प्रकार सुरु होईल”.

आणखी वाचा – अंकिता लोखंडे आई होणार?, भरकार्यक्रमात असं काही बोलून गेली की सगळे पाहतच बसले, म्हणाली, “मी धावू शकत नाही कारण…”

“त्यांचा मिलनाचा काळ. मादी जमिनीलगत असते, नर आपल्या प्रकाशानी तिला आकर्षित करत असतात. अशा ठिकाणी बुटांनी जमीन तुडवत टॉर्चचा प्रकाश आणि बडबड करुन घोळक्यानी तिथे निसर्गाची लय बिघडून टाकायची. खूनच करायचा. खूप लिहायचंय पण उद्विग्नतेमुळे थकले. रामकृष्ण हरी, पांडुरंगा सांभाळ रे”.

आणखी वाचा – पत्नी १४ वर्षांची असतानाच साखरपुडा, लग्न अन्…; जेठालालच्या खऱ्या आयुष्यातील दया कोण?, अभिनेत्याची हटके लव्हस्टोरी

शुभांगी यांची ही सुचक पोस्ट अगदी नेटकऱ्यांनाही पटली. त्यांनी या पोस्टवर विविध कमेंट करत आपलं मत व्यक्त केलं. बेशिस्त वृत्ती अधिक वाढत चालली आहे, शुभांगी ताई अगदी खरं आहे, सगळा बाजार, पब्लिसिटीचा खेळ आहे. याशिवाय कोणाला जगताच येत नाही, मी तुमच्या मताशी अगदी सहमत आहे, सगळ्याचा अतिरेक सुरु झाला आहे, नऊवारी साडी नेसून रिल करायची की, झाली वारी अशा विविध कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Tags: entertainment newsmarathi actormarathi actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Ghabadkund Movie
Entertainment

घुंगरांचा आवाज, रहस्य थरार अन्…; सोन्याच्या मोहात विहिरीत उतरले संदीप पाठक, ‘घबाडकुंड’ मिळणार का?

एप्रिल 17, 2026 | 11:15 am
Next Post
Shubhanshu Shukla Parents Emotional

४१ वर्षांनी अंतराळात पोहोचला शुभांशु शुक्ला, लेकाची कर्तबगारी पाहून आईला रडू अनावर, वडीलही भावुक झाले अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.