गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अंकिता लोखंडे आई होणार?, भरकार्यक्रमात असं काही बोलून गेली की सगळे पाहतच बसले, म्हणाली, “मी धावू शकत नाही कारण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 26, 2025 | 1:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ankita Lokhande Goodnews

अंकिता लोखंडे आई होणार?, भरकार्यक्रमात असं काही बोलून गेली की सगळे पाहतच बसले, म्हणाली, "मी धावू शकत नाही कारण…"

Ankita Lokhande Goodnews : अभिनेत्री अंकिता लोखंडे टेलिव्हिजन उद्योगातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अंकिता तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिलेली दिसली आहे. अभिनेत्रीने पेशाने व्यायसायिक असलेल्या विक्की जैनशी लग्न केले. अंकिताचा नवरा विक्की जैनही आता अंकितापेक्षा अधिक चर्चेत राहतो. आजकाल दोघेही ‘लाफ्टर शेफ’मध्ये धुमाकूळ घालताना दिसतात. दोघांची जोडी या शोमध्ये धमाल मस्ती करताना दिसते. या शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अंकिता गुडन्यूज देताना दिसली आहे. अंकिताच्या तोंडून निघालेल्या या गोड बातमीने चाहत्यांमध्ये आनंदच वातावरण पाहायला मिळत आहे. अनेकजण अंकिताने केलेलं हे वक्तव्य खरं आहे का असा सवाल करताना दिसत आहेत.

लाफ्टर शेफच्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, अंकीताला चुकवून कृष्णा अभिषेक एक जिन्नस घेऊन धावत असतो. अंकिता तो जिन्नस घेण्यासाठी त्याच्या मागे धावते. अंकीता धावत असताना ती अचानक थांबते आणि म्हणते, “मी गरोदर आहे. मी धावू शकत नाही”. अंकिताचे हे वाक्य ऐकून प्रत्येकाला धक्का बसतो. यावर कृष्णा अभिषेकही थांबतो आणि विचारतो, खरंच का?. यावर अंकिता हसायला सुरुवात करते. मग कृष्णाने अभिषेक अंकिताला चिडवायला, “आज हमारे घर में आ रहा लल्ला है”, असं म्हणते. हे ऐकून करण कुंद्रालाही धक्का बसतो.

आणखी वाचा – ओठ-चेहरा सुजला, वजन घटलं आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकरची वाईट अवस्था, घटस्फोटानंतरची परिस्थिती…

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

या प्रकरणात आता किती सत्य आहे हे अर्थात अंकिताच सांगू शकेल. कारण यापूर्वी, अंकिताने शो लॉकअपमध्येही तिच्या गरोदरपणाची बातमी दिली होती. ‘कलर्स टीव्ही’ने हा व्हिडीओ शेअर केला आहे आणि लिहिले आहे की, “अंकीताने लाफ्टर शेफला कन्फ्युज केले आहे. तिने एक विशेष बातमी दिली आहे”. अंकिताने व्यापारी विक्की जैनशी लग्न केले आहे. या दोघांनी डिसेंबर २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांचे भव्य लग्न बरेच चर्चेत राहिले आहे.

आणखी वाचा – १५ वर्षांचा संसार मोडला, घटस्फोटानंतर लता सभरवाल यांची पहिली पोस्ट, म्हणाल्या, “सुंदर चेहरा शोधणे सोपे पण…”

लग्नानंतर अंकिता तिच्या पतीबरोबर शोमध्ये सहभागी होताना दिसली. विक्की आणि अंकिताने स्मार्ट जोड़ी या शोमध्ये भाग घेतला होता. आणि ते या शोचे विजेते झाले. यानंतर, दोघेही ‘बिग बॉस’मध्ये दिसले. त्यानंतर आता ही जोडी लाफ्टर शेफ मध्ये सहभागी झाली असून धुमाकूळ घालत आहे.

Tags: ankita lokhandeAnkita Lokhande vicky jainentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Shubhangi Gokhale on ashadhi wari

“मेकअप करुन अन्नपूर्णांच्या मध्येच जबरदस्ती घुसून...”, आषाढी वारीवरुन शुभांगी गोखलेंची पोस्ट, नेटकऱ्यांनीही दिला पाठिंबा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.