‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचं नाव समोर आलं की, यामधील विविध पात्र डोळ्यांसमोर उभी राहतात. त्यातीलच एक पात्र म्हणजे जेठालाल. सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप जोशी यांनी जेठालाल हे पात्र अजरामर केलं असं म्हणणं वावगं ठरणार नाही. मालिका सुरु होऊन १५ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला असला तरी त्याची क्रेझ काही कमी झालेली नाही. आजही प्रेक्षक ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ आवडीने पाहतात. मालिकेचे जुने भागही पुन्हा पुन्हा पाहणं प्रेक्षक पसंत करतात. जेठालाल-दयाची जोडी तर सुपरहिट ठरली. पण दिलीप जोशी यांच्या आयुष्यातील खरी दया कोण आहे? याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. (Dilip Joshi real life wife)
दिलीप त्यांचं काम आणि कुटुंब यामध्येच रमलेले असतात. खासगी आयुष्याबाबतही कॅमेऱ्यासमोर उघडपणे बोलणं नेहमीच त्यांनी टाळलं. मध्यंतरी एका मुलाखतीत मात्र त्यांनी आपल्या लव्हस्टोरीबाबत भाष्य केलं होतं. त्यांची लव्हस्टोरी म्हणजे ‘बालिका वधू’शी मिळती जुळती असल्याचं ते म्हणतात. पत्नी जयमाला जोशी आणि लव्हस्टोरीबाबत त्यांनी पहिल्यांदाच खुलेपणाने भाष्य केलं होतं.
दिलीप १८ वर्षांचे आणि पत्नी १४ वर्षांची असतानाच त्यांचा साखरपुडा झाला होता. अगदी कमी वयात त्यांच्या आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली होती. याचबाबत त्यांनी पहिल्यांदा सांगितलं. कामामध्ये सतत व्यग्र असताना कुटुंबाला तुम्ही कसा वेळ देता?, सगळं कसं सांभाळता? असा प्रश्न दिलीप यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी सुंदर उत्तर दिलं.
आणखी वाचा – १५ वर्षांचा संसार मोडला, घटस्फोटानंतर लता सभरवाल यांची पहिली पोस्ट, म्हणाल्या, “सुंदर चेहरा शोधणे सोपे पण…”
दिलीप म्हणालेले, “आमच्यामध्ये रोमान्स तर कधी झालाच नाही. आमची लव्हस्टोरी म्हणजे बालिका वधूसारखी आहे. माझी पत्नी १४ वर्षांची आणि मी १८ वर्षांचा असतानाच आमचा साखरपुडा झाला होता. पत्नी जेव्हा १८ वर्षांची झाली आणि मी २२ वर्षांचा झालो तेव्हा आमचं लग्न झालं. मुलांच्या शाळेमध्येच माझं शिक्षण झालं. त्यामुळे मुलींशी बोलायलाच मी घाबरायचो. अभिनय, नाटक सुरु केल्यानंतर बोलायचं कसं? हे मला कळू लागलं”. दिलीप व जयमाला यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. २०२१मध्ये मुलगी नियतीचं थाटामाटात लग्न झालं.





