बरीच वर्षे हिंदी सिनेसृष्टीत काम केल्यानंतर अचानक मराठी सिनेविश्वाकडे पावलं वळवणारी अभिनेत्री म्हणजे खुशबू तावडे. बऱ्याच वर्षांनी खुशबूने मराठी सिनेसृष्टीत पाऊल टाकलं असून झी मराठी वाहिनीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेतून ती छोटा पडदा गाजवायला सज्ज होत आहे. मनासारखी भूमिका आजवर न मिळाल्याने खुशबू बराच काळ सिनेमाविश्वापासून दूर होती. मात्र अनुभवातून बरेच धडे घेत तिने पुन्हा एकदा कमबॅक केलं आहे. (Khushboo Tawde On Sara Kahi Tichyasathi)
झी मराठी वाहिनीवर आजपासून सुरु होणाऱ्या सारं काही तिच्यासाठी या मालिकेची सगळीकडे धामधूम सुरु आहे. मालिकेच्या पहिल्या एपिसोडसाठी कलाकारांसोबत प्रेक्षकही उत्सुक असलेले पाहायला मिळत आहेत. या मालिकेत अभिनेते अशोक शिंदे, खुशबू तावडे, शर्मिष्ठा राऊत या कलाकारांना पडद्यावर पाहणं रंजक ठरणार आहे. विशेषतः खुशबूच्या या मालिकेतील लूकची, तिच्या साधेपणाची चर्चा होताना दिसतेय. उमा हे चाळीशीदरम्यानच पात्र खुशबूने मालिकेत साकारलं आहे.
पाहा मालिकेबाबत खुशबू नेमकं काय म्हणाली आहे (Khushboo Tawde On Sara Kahi Tichyasathi)
मालिकेत उमा ही भूमिका खुशबूच्या वयापेक्षा काहीशी मोठी दाखवण्यात आली आहे, याबद्दल ‘इट्स मज्जा’सोबत संवाद साधताना खुशबू तावडे म्हणाली की, “उमा ही भूमिका वयाने मोठी आहे, आणि खऱ्या आयुष्यातही मी वागताना तीन चार वर्षे मोठी असल्यासारखीच वागते. त्यामुळे वयामुळे स्वभावात बदल करण्याची तशी अडचण आलीच नाही. पण मला त्या भूमिकेसाठी, त्या वयाच्या भूमिकेत मी तशी दिसण्यासाठी मला मेहनत करावी लागली”.
“मालिकेची संपूर्ण टीम मला खूप सपोर्ट करतेय. ही मालिका मुळात कोकणातल्या कथानकांसोबत संबंधित आहे. आणि त्यात मी मूळची कोकणातली आहे, त्यामुळे मला मालवणी भाषा येते. फक्त थोडीफार बोलता येत नाही. दरवर्षी मी गणपतीत व मे महिन्यात गावी जाणं होतं. आणि फार कमी दिवस तिथे राहतो त्यामुळे बोललेली भाषा मला कळते, बोलायला थोडंफारच जमत. त्यामुळे या मालिकेत काम करताना मला भाषेमुळे कोणत्या अडचणीचा सामना करावा लागेलला नाही आहे”.
२१ ऑगस्टपासून ‘सारं काही तिच्यासाठी’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला येत आहे. ‘झी मराठी वाहिनी’वर दररोज संध्याकाळी ७ वाजता ही मालिका पाहायला विसरू नका.