छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात प्रसिद्ध झालेले अभिनेते अरुण कदम यांच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. कारण, अरुण कदम यांची लेक सुकन्या नुकतीच आई झाली आहे. कदम कुटुंबियांच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. सुकन्याने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. दोन्ही कुटुंबांमध्ये हा आनंद मोठ्या जल्लोषात साजरा केला जात असून घरी चिमुकल्याचं आगमन करण्यासाठी सध्या सगळ्यांची धावपळ सुरु आहे. (Arun Kadam welcomes his grandson)
अशातच लेक सुकन्या हिने नुकतेच काही फोटोज शेअर केले असून या फोटोजमध्ये मात्र बाळाचा चेहरा लपवण्यात आला आहे. बाळाचे आजोबा अरुण कदम, आजी वैशाली कदम आणि वडील सागर यांनी बाळाला दोन्ही हातांवर घेतले. यावेळी नातवाला हातावर घेताना आजी-आजोबांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. सुकन्याने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटोज शेअर केला असून “It’s a baby boy ????????????” असं छानसं कॅप्शन दिलेलं आहे. सुकन्याच्या या पोस्टवर हास्यजत्रेतील सहकलाकार रसिका वेंगुर्लेकरने अरुण कदम व सुकन्याचे अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर चाहतेही अरुण कदम व त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन करत आहे.
हे देखील वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदम झाले आजोबा, लेकीने दिला गोंडस मुलाला जन्म
अरुण कदम व त्यांच्या पत्नी वैशाली यांनी लेकीच्या गरोदरपणात तिचे सगळे लाड पुरवले. इतकंच नव्हे तर अगदी राजेशाही थाटात सुकन्याच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला होता, ज्याची चर्चा जोरदार रंगली होती. शिवाय, सुकन्याने पारंपरिक वेशभूषेत मॅटर्निटी फोटशूट केले होते, त्याचीदेखील चर्चा झाली होती.
हे देखील वाचा – Video : ‘इंडियाज बेस्ट डान्सर’च्या मंचावर ‘बाईपण भारी देवा’च्या टीमची मंगळागौर, ‘नाच गं घुमा’ म्हणत प्रेक्षकांनाही नाचवलं, व्हिडिओ व्हायरल
अरुण कदम यांची लेक सुकन्या ही कमर्शिअल आर्टिस्ट, ग्राफिक डिझायनर आहे. तसेच ती भरतनाट्यमदेखील शिकली आहे. अरुण व लेक सुकन्या यांचं बॉण्डिंग उत्तम असून बापलेकीची ही जोडी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. त्यांचे अनेक व्हिडिओज व्हायरल होतात. (Arun Kadam welcomes his grandson)