मराठी मालिका, चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत आजवर प्राजक्ता माळीने प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. ती इथवरच थांबली नाही. तिने सुत्रसंचालनाची धुराही उत्तमरित्या सांभाळली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन ती उत्तम पद्धतीने करते. ती उत्तम नृत्यांगणनाही आहे. पुण्यामध्ये तिचे डान्स क्लासेसही आहेत. शिवाय आता ती एक व्यावसायिकाही आहे. काही महिन्यांपूर्वीच प्राजक्ताने स्वतःचा ज्वेलरी ब्रँड सुरु केला. उत्तमोत्तम काम करणारी ही अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. (Prajakta Mali Farmhouse)
प्राजक्ताने चक्का स्वतःचं एक आलिशान फार्महाऊस तयार केलं आहे. तिने कर्जतमध्ये निसर्गाच्या कुशीत फार्महाऊस उभारलं. तिने या फार्महाऊसचे फोटो पोस्ट करत याबाबत माहिती दिली होती. या फोटोंमध्ये तिचं फार्महाऊस किती मोठं आहे याचा अंदाज आला. शिवाय फार्महाऊसच्या अवतीभोवती हिरवागार निर्सग आहे. आलिशान फार्महाऊसच्या शेजारी सुंदर झाडं आणि आजूबाजुचा परिसर तिने सजवला आहे.
प्राजक्ताने आता तिच्या फार्महाऊसचे आणखी काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या कुटुंबासह ती या फार्महाऊसवर पोहोचली. इथे तिने निर्सगाच्या सानिध्यात खूप धमाल मस्ती केली. प्राजक्ता तिच्या फार्महाऊसजवळ असलेल्या धबधब्याजवळ कुटुंबियांना घेऊन गेली. तेथील काही फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
तिने फोटो शेअर करत म्हटलं की, “निर्सगाच्या सानिध्यात तुम्हाला खूप बरं वाटतं. पण कुटुंबासह निर्सगाचा आनंद लुटणं अधिक उत्तम”. खानदानातील सर्वात मोठं कर्ज घेऊन फार्महाऊस तयार केल्याचं प्राजक्ताने म्हटलं होतं. याआधी प्राजक्ताने पुण्यातही स्वतःच घर खरेदी केली. आता तिने शेअर केलेल्या फोटोंना नेटकऱ्यांची अधिकाधिक पसंती मिळताना दिसत आहे.