शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पुण्याला जाताना दुप्पट टोल घेतल्यामुळे सुप्रसिद्ध अभिनेत्री संतापली, व्हिडीओ नितीन गडकरींनाही केला टॅग, म्हणाली, “हा कुठला नियम?”

Darshana Shingadeby Darshana Shingade
ऑगस्ट 7, 2023 | 2:14 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Rujuta Deshmukh Angry

Rujuta Deshmukh Angry

नाटक,मालिका, चित्रपट अशा सर्व माध्यमांत काही कलाकार आपल्या अभिनयाची छाप पाडून प्रेक्षकांच्या मनात कायमच स्थान मिळवतात.अशीच एक अभिनेत्री म्हणजे ऋजुता देशमुख.बऱ्याच काळापासून ऋजुता प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.शूटसाठी अनेकदा कलाकारांना घरापासून, कुटुंबापासून दूर राहावं लागत. त्यामुळे वेळ मिळतो तेव्हा कुटुंबाला भेटण्याचा मोह आवरत नाही. ऋजुताच माहेर,सासर पुण्यात आहे.ती बरीच वर्ष मुंबईत राहते. पंरतु आई-वडील, सासू-सासरे पुण्यात असल्याने ऋजुताचा बऱ्याचदा मुंबई-पुणे प्रवास सुरु असतो. (Rujuta Deshmukh Angry)

३१ जुलै रोजी प्रवासादरम्यान मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर टोल बाबतचा एक अनुभव ऋजुताला आला. जास्त टोल त्यांच्या कडून आकारण्यात आला त्या संदर्भातला एक व्हिडिओ ऋजुताने “तुम्हाला काय वाटतं? अशा अनेक गोष्टी घडतात आणि आपण किंवा मी गप्प बसते. कारण परिणाम होईल याची खात्री नसते.या वेळी मनात आलं, बोलून बघूया ! खरचं असा नियम आहे का? आणि असला तर तो बरोबर आहे का?” असं कॅप्शन देत शेअर केला आहे.

पाहा ऋजुता देशमुख का भडकलीय? (Rujuta Deshmukh Angry)

ऋजुताने एक व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की, “३१ जुलैला मी, माझी मुलगी आणि नवरा शिरीष आम्ही तिघे पुण्याला निघालो होतो. आम्ही पुण्याला जाताना वाटेत लोणावळ्याला अनेकदा थांबतो. तिथे चहा पिऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आणि तुम्हाला माहीत आहे की, टोलचे मेसेज किंवा मेल्स मोबाइलवर उशिराने येतात. सामान्यपणे मुंबई-पुणे प्रवास करताना खालापूर टोलनाक्यावर २४०रुपये आणि तळेगाव टोलनाक्यावर ८० रुपये टोल घेतला जातो. मी पुण्याला घरी पोहोचल्यावर माझ्या नवऱ्याला टोल संदर्भात मेसेज आला होता, त्यामध्ये खालापूरला २४० आणि तळेगावला ८० ऐवजी २४० रुपये वजा करण्यात आले होते, म्हणजे एकूण ४८० रुपये टोल गेला होता. याची मी रितसर तक्रार केली पण, अजून मला त्याचे उत्तर मिळालेले नाही.”

हे देखील वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, याच महिन्यात लग्नाचा वाढदिवस होता पण…

View this post on Instagram

A post shared by Rujuta Deshmukh (@rujutadeshmukhofficial)

पुढे बोलताना ऋजुता म्हणाली की, “दुसऱ्या दिवशी (१ ऑगस्ट) पुन्हा मुंबईला जायला निघाले तेव्हा टोल नाक्यावर गाडी थांबवून मी तेथील मॅनेजरला भेटले. तेव्हा त्याने मला सांगितले, “मॅडम तुम्ही लोणावळ्याला उतरलात म्हणून असा टोल कापण्यात आला आहे. आता मुंबई ते लोणावळा २४० आणि लोणावळा ते पुणे २४० असे दोन भाग झाले आहेत. जेव्हापासून फास्ट टॅग सुरु झाला तेव्हापासून हे सुरु झाले असे ते म्हणाले.”

पाहा ऋजुता देशमुखने टोल भरण्यावरून केला नितीन गडकरींना सवाल (Rujuta Deshmukh Angry)

“टोलच्या मॅनेजरने मला दोन टप्पे केल्यामुळे असा टोल कापल्याचे सांगितले. खरेतर मुंबई ते लोणावळा ८३ किलोमीटर अंतर आहे तर, लोणावळा ते पुणे ६४ किलोमीटर अंतर आहे. फक्त लोणावळ्याला थांबले म्हणून दुप्पट टोल? मला अजून कशाचे उत्तर मिळालेले नाही. अंतर वेगवेगळे असताना असा टोल कापणे योग्य आहे का? तुम्हाला काय वाटते?” असे प्रश्न तिने आता नेटकऱ्यांना विचारले आहेत.

हे देखील वाचा – स्पृहा जोशीच्या बहिणीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, म्हणाली, “भारताचं नेतृत्व..”

तर अनेकांनी असा नियम आहे याबाबत कमेंट्स मध्ये सांगितलं आहे, त्यावर ऋतुजाने उत्तर दिलेलं पाहायला मिळालं, ऋजुता म्हणाली, नियम बरोबर असेल तर तो प्रत्येक वेळेला आकाराला पाहिजे, आज आहे परवा नाही असं कसं? हा प्रश्न तुम्हला नाहीये.

Tags: nitin gadkarirujuta deshmukhrujuta deshmukh angry
Darshana Shingade

Darshana Shingade

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Pravin Tarde in SS Rajamouli Film

प्रविण तरडेंची मोठी घोषणा, एसएस राजामौलींच्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार, म्हणाले, "त्यांनी मला पाहिलं अन्…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.