मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकरांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मराठी इंडस्ट्रीबाबत स्पष्ट मत मांडलं आहे. गेली अनेक वर्षे त्या मराठी नाटक, टेलिव्हिजन मालिकांमार्फत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. सविता मालपेकर त्यांच्या प्रत्येक भूमिकेसाठी विशेष मेहनत घेऊन प्रेक्षकांचं मन नेहमीच जिंकून घेतात. त्या अतिशय स्पष्टवक्त्या आहेत, न पटणाऱ्या मुद्द्यांविषयी सविता मालपेकर नेहमीच आपलं ठाम मत मांडताना दिसतात. अशातच इट्स मज्जाच्या ठाकूर विचारणार या मुलाखतीच्या कार्यक्रमात त्यांनी मराठी इंडस्ट्रीत व इंडस्ट्रीतील कलाकारांमध्ये एकता नसल्याचे भाष्य केलं आहे. Savita Malpekar On Marathi Industry)
यावेळी सविता यांनी असं म्हटलं की, “आपल्याकडे कलाकारांची संघटना नाही, यांचे कारण आपल्याकडे एकी नाही. आपले कलाकार कधीच एकत्र येऊ शकत नाहीत. कुणीही कितीही काहीही म्हणूदे. ते एकत्र आले असते तर आपली मराठी इंडस्ट्री वेगळी दिसली असती. तुझ्यासाठी मी का बोलू ही वृत्ती आहे आपल्याकडे. ही वृत्ती जोपर्यंत आपल्याकडून जात नाही. तोपर्यंत आपल्याकडे संघटना होऊ शकत नाही. हिंदीससह साऊथमध्ये कलाकारांच्या संघटना आहेत, पण आपल्याकडे कलाकारांच्या संघटना नाहीत”.
आणखी वाचा – ‘पुष्पा २’चा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, कधी व कुठे पाहता येणार? जाणून घ्या…
यापुढे त्यांनी असं म्हटलं की,”बाकीच्या सर्व क्षेत्रात संघटना आहेत, पण कलाकारांच्या संघटना नाहीत. यासाठी कुणीच पुढाकार घेत नाही आणि घेतला तर त्याला नवे ठेवली जातात. मी प्रयत्न केला पण नावे ठेवली गेली”. याचवेळी त्यांनी कलाकारांच्या मानधनाबद्दलही आपली भूमिका स्पष्ट केली. याबद्दल त्या असं म्हणाल्या की, “पूर्वी चार पैसे कमी मिळत होते. आपण नऊ ते सहा ही वेळ होती आणि या वेळेचे ठरलेले पैसे मिळायचे. जे काय दोनशे-चारशे रुपये मिळायचे ते मिळायचे”.
यापुढे त्या असं म्हणाल्या की, “रोजच्या कामाचे पैसे संध्यायकळी मिळायचे आणि ते पैसे मिळण्याचा आनंद काही वेगळाच होता. आता पैसे मिळतात. पण दोन-चार महिन्यांनी मिळतात. याबद्दल बोलायला गेलं की, सविता मालपेकराचं काय जात आहे बोलायला असं पाठीमागे बोललं जातं”