‘पुष्पाः द राइज’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्याचे खूप कौतुक केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप यशस्वी ठरला आणि आता या चित्रपटाचा दूसरा भाग ‘पुष्पाः द रुल’ हा या वर्षी प्रदर्शित होणार आहे. सुपरस्टार अल्लू अर्जुनचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा: द रुल’ अखेर ०५ डिसेंबर २०२४ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. त्याआधी या चित्रपटाच्या ट्रेलरची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. या भव्य ट्रेलर लॉंचसाठी चित्रपटाची टीम पटणा इथे पोहोचली आहे. ‘पुष्पा २’चा आगामी व बहूप्रतिक्षित ट्रेलर १७ नोव्हेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. (Pushpa 2 Trailer)
‘पुष्पा २’ चा ट्रेलर आज म्हणजेच १७ नोव्हेंबर रोजी बिहारची राजधानी पाटणा येथील गांधी मैदानावर संध्याकाळी ५ वाजता प्रदर्शित होणार आहे. यासाथी ‘पुष्पा २’ टीमचे अनेक स्टार्स दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कार्यक्रमात भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा सिंग दमदार परफॉर्मन्स करणार आहे. पुष्पा मूव्हीच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर ही माहिती शेअर करण्यात आली आहे. त्यानुसार पाटणा ऐतिहासिक दिवसाचे साक्षीदार होणार आहे. लोकप्रिय भोजपुरी स्टार अक्षरा सिंग ‘पुष्पा २’ ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये खास परफॉर्मन्स देणार आहे.
आणखी वाचा – प्रसिद्ध सरोद वादक आशिष खान यांचे निधन, वयाच्या ८४ व्या वर्षी घेतला अमेरिकेत घेतला अखेरचा श्वास
गांधी मैदान, पाटणा येथे सायंकाळी ५ वाजता लॉन्च होईल. तर ‘पुष्पा २’ चित्रपटाचा हिंदी ट्रेलर टी-सीरीजच्या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित केला जाईल. संध्याकाळी ६ वाजता यूट्यूबवर प्रदर्शीत होईल. या कार्यक्रमाची संपूर्ण झलकही यूट्यूबवर थेट पाहता येणार आहे. ‘पुष्पा २’ चित्रपटाचा ट्रेलर तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि बंगाली आदी भाषांमध्ये रिलीज होणार आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना व्यतिरिक्त, दिग्दर्शक सुकुमार देखील ‘पुष्पा २’ ट्रेलर रिलीज इव्हेंटमध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट ०५ डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.
हिंदी ट्रेलर लॉन्चसाठी पटणा हे ठिकाण निवडणे हे अल्लू अर्जुन आणि चित्रपट निर्मात्याने हिंदी भाषिक प्रदेशांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी उचललेले एक धाडसी पाऊल दर्शवते. निर्मात्यांनी नमूद केले की हा उपक्रम चित्रपटाला नवीन उंची गाठण्यास मदत करेल.