‘फुबाईफू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री विशाखा सुभेदार या नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी विशाखा यांचा मुलगा परदेशात शिकायला गेला. M. A. In Film Making ही शिक्षण पूर्ण करण्यासाठी तो लंडनला गेला असून लेकाच्या पाठवणीच्या वेळी विशाखा यांनी भावुक पोस्ट शेअर केली होती. अशातच आज त्याचा वाढदिवास आहे आणि लेकाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पुन्हा एकदा एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री विशाखा सुभेदारने मुलाच्या वाढदिवसानिमित्ताने दोन पोस्ट लिहिल्या आहेत. (Vishakha Subhedar Son Abhinay Subhedar Birthday)
पहिल्या पोस्टमध्ये तिने ‘शुभविवाह’ मालिकेच्या सेटवरील अभिनयचा व्हिडीओ शेअर केला तर दुसरा व्हिडीओ हा अभिनय लंडनला जात असताना त्यांच्या घरी काढलेल्या भावुक क्षणांचा आहे. मालिकेच्या सेटवरील व्हिडीओसह त्यांनी लेकाविषयी असं म्हटलं आहे की, “जेव्हा आपण एकत्र ‘शुभविवाह’च्या सेटवर काम करायचो. तेव्हा हा व्हिडीओ मी गुपचूप केला होता. मला वाटलं होतं की तु कामाच्या ठिकाणी फोनवर होतास. नंतर तू मला दाखवलं की तू प्रॉपर्टी काढत होतास. बऱ्याचदा असंच होतं की, मला वाटतं की पोरगं टंगळ मंगळ करत आहे. पण तू फोकस राहून काम करत होतास”.
यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “तू जेव्हा कामात असतोस तेव्हा १०० टक्के कामात आणि आरामात असतोस तेव्हा १०० टक्के आरामात… हे असं राहणं खूप अवघड असतं खरंतर. पण तुमच्या पिढीला जमत बाई हे असं शांत राहणं आणि तरीही ऑन-ऑफ बटण कधी वापरायचं हेदेखील तुला माहित आहे. मुळातच खूप बॅलेंस असलेला आहेस तू. असाच राहा. खूप मोठा हो आणि जे शिकायला परदेशी गेला आहेस ते सगळं शिक्षण पूर्ण करुन, छान अनुभवाने मोठा होऊन ये. देव तुला जे जे हवं ते ते देवो. हेच देवाकडे आईचं मागणं. अभिनय सुभेदार वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप प्रेम अबुली”.
आणखी वाचा – प्रसिद्ध सरोद वादक आशिष खान यांचे निधन, वयाच्या ८४ व्या वर्षी घेतला अमेरिकेत घेतला अखेरचा श्वास
त्यानंतर विशाखा सुभेदारने मुलगा परदेशी जातानाचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, “हॅप्पी बर्थडे अभिनय सुभेदार…जे जे तुला हवं ते ते ईश्वर तुला देवो…परदेशी तुझं स्वामी रक्षण करोत…दत्त म्हणून नेमका सज्जन माणूस तुझ्या पुढ्यात उभा राहो…आईसाहेब वणीस्थानी राहून तुझ्यावर लक्ष ठेवून आहेतच…आणि या आईकडून तुला खूप खूप आशीर्वाद आणि प्रेम”. दरम्यान, विशाखा यांच्या या पोस्टखाली अनेकांनी अभिनयला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.