आपल्या दमदार अभिनयाने मराठी मनोरंजन क्षेत्राबरोबरच हिंदी सिनेविश्वातदेखील छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सई तिच्या सोशल मीडियावर अनेक ग्लॅमरस फोटो-व्हिडीओ शेअर करत असते. सोशल मीडियावरून ती तिचे फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सोशल मीडियावर सईचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. चाहते तिच्या फोटो-व्हिडीओला भरभरून लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद देताना दिसतात. अशातच या अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर दिवाळीनिमित्त खास फोटो शेअर केले आहेत. (Saie Tamhankar Shared Video)
सईने काही महिन्यांपूर्वी मुंबईत स्वत:चं पहिलं घर घेतलं. या घराला तिने ‘द इलेव्हन्थ प्लेस’ असं नाव दिलं आहे. सईने हे नवीन घर घेतल्यानंतर कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळींबरोबरच तिच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. या नवीन घराची काही खास क्षणचित्रे तिने तिच्या सोशल मीडियासह युट्यूब चॅनेलवर चाहत्यांबरोबर शेअर केली होती. अशातच आता दिवाळीचं खास औचित्य साधून सईने तिच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना घरी आमंत्रित केलं होतं आणि निमित्त होतं ‘दिवाळी पहाट’. याचे काही फोटो-व्हिडीओ सईने चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
सईने तिच्या स्वत:च्या पहिल्यावाहिल्या नवीन घरात दिवाळीनिमित्त ‘दिवाळी पहाट’चं आयोजन केलं होतं. या खास कार्यक्रमासाठी तिने तिच्या जवळच्या खास मित्र-मैत्रिणींना आमंत्रित केले होते. सईचं नवं घर पाहण्यासाठी आणि तिला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी तिच्या घरी अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. प्रिया बापट, सारंग साठ्ये, कादंबरी कदम, समीर विद्वांस, उमेश कामत असे बरेच कलाकार सईच्या घरी आले होते. प्रिया बापटने तिच्या सोशल मीडियावर “खूप प्रेम सई ताम्हणकर” असं म्हणत या दिवाळी पहाट कार्यक्रमानिमित्त तिचे आभार मानले. त्याचबरोबर समीर विद्वांसने “ही बहारदार सकाळ कायम स्मरणात राहील” असे म्हटले आहे. सारंगने ही या “अद्भुत अनुभवासाठी धन्यवाद” म्हणत सईला शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा – सोनाली कुलकर्णीने दुबईमध्ये खरेदी केलं आलिशान घर, फोटो शेअर करत दाखवली झलक, कसं आहे अभिनेत्रीचं घर?
दरम्यान सईने नवीन घराचा व्हिडीओ शेअर करताच घरातील आकर्षक शोभेच्या वस्तू, मोठमोठ्या खिडक्या, फर्निचर, त्याचबरोबर हॉलमध्ये ठेवलेली झाडं, फुलांनी केलेली सजावट, विद्युत रोषणाई आणि घरातील प्रशस्त खोल्यांनी अनेक नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं. सई तिच्या हटके फोटोंमुळे कायमच चर्चेत असते. त्यानंतर तिने शेअर केलेल्या या ‘दिवाळी पहाट’च्या खास कार्यक्रमामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.