बुधवार, सप्टेंबर 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“पाडव्यालाही अशाच पोजमध्ये…”, ऐश्वर्या नारकरांनी ‘तो’ व्हिडीओ शेअर केल्यानंतर नेटकऱ्याची कमेंट, अभिनेत्रीचा संताप, म्हणाल्या, “यांच्या विचारांचं…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 14, 2023 | 4:08 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
aishwarya narkar answered to trollers

aishwarya narkar answered to trollers

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. त्यांनी आपल्या अभिनयाच्या व सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. ९०च्या दशकापासून त्यांची क्रेझ आजही तितकीच आहे. सध्या त्या ‘झी मराठी’वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारताना दिसतात. ऐश्वर्या सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय असतात. विविध ट्रेंन्डिंग गाण्यावर व्हिडीओ, रिल्स बनवताना दिसतात. या व्हिडीओंना नेटकऱ्यांकडून बरीच पसंती मिळत असते. पण बऱ्याचदा त्यांना ट्रोलचाही सामना करावा लागतो. बऱ्याचदा ऐश्वर्या त्यांना सडेतोड उत्तरही देताना दिसतात. आताही ऐश्वर्या यांनी योगा सेशनचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यावर एका ट्रोलर्सने पुन्हा त्यांना ट्रोल केलं आहे. त्यावर पुन्हा ऐश्वर्या यांनी अनोख्या अंदाजात सुनवलं आहे.(aishwarya narkar answered to trollers)

ऐश्वर्या या त्यांच्या अभिनयासह त्यांच्या फिटनेससाठीही बर्याच चर्चा होताना दिसतात. त्यांच्या फिटनेसची तर बातच निराळी आहे. अगदी युगापिढीलाही लाजवेल असा त्यांचा फिटनेस आहे. त्यांच्या फिटनेसचं रहस्य म्हणजे त्यांचं नेहमीचं वर्कआऊट शेड्युल ज्या त्या नेहमी काटेकोरपणे पाळताना दिसतात. त्या इन्स्टाग्रामवर त्यांचे योगा सेशनचे व्हिडीओ शेअर करत असतात.

आणखी वाचा – सलमान खानचा ‘टायगर ३’ पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये तुफान गर्दी, ‘जवान’चाही मोडला रेकॉर्ड, आतापर्यंत कमावले तब्बल इतके कोटी

आताही त्यांनी त्यांच्या नवीन आसन प्रकाराचा व्हिडीओ पोस्ट केला होता. शेअर केलेल्या व्हिडीओत ऐश्वर्या शीर्षासन हा ताळमेळ साधण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण प्रकार करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये, ‘सराव करा… नक्की ध्येय गाठाल…’, असं लिहीलं आहे.हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

आणखी वाचा – Video : …अन् ‘टायगर ३’ चित्रपट सुरु असतानाच थिएटरमध्येच प्रेक्षकांनी फोडले फटाके, पळापळ झाली आणि…; भयानक व्हिडीओ समोर

नेटकऱ्यांनीही लाईक, कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे. तर दुसऱ्या बाजुला ट्रोलर्सनी संधी साधली आहे. त्या व्हिडीओवर, ‘वा वा आज पाडव्याला अशाच पोजमध्ये ओवाळायचे असते’, असं लिहीत कमेंट केली आहे. याला उत्तर देत ऐश्वर्या यांनी व्हिडीओसहीत कमेंटचा स्कीनशॉट शेअर करत ‘यांच्या विचारांचं काय करावं!?’, असा उद्गारार्थी प्रश्न उपस्थित केला आणि पुन्हा एकदा ट्रोलर्सना त्यांच्या अंदाजात उत्तर दिलं आहे.

Tags: aishwarya narkaranswered to trollersmarathi actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
Aadesh & Suchitra Bandekar celebrates 33rd Marriage Anniversary

Video : एकमेकांना केक भरवला, सेलिब्रेशन अन्…; आदेश व सुचित्रा बांदेकरांच्या लग्नाला ३३ वर्ष पूर्ण, लेक सोहम म्हणाला, "तुमचा त्याग, कष्ट…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.