ऋतुजा बागवे या मराठी अभिनेत्रीने तिच्या अभिनय कौशल्याने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. मालिका नाटकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येतच असते. नांदा सौख्यभरे, चंद्र आहे साक्षीला या मालिकांमधील तर अनन्या या नाटकातील तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. तसेच ऋतुजा तिच्या सोशल मीडिया वरही बरीच सक्रिय असल्याचे आपल्याला दिसून येते.तिची ग्लॅमरस पोस्ट, रील्स ही प्रक्षकांना आकर्षित करतात.(Rutuja Bagwe)
घर हा प्रत्येकासाठी आपुलकीचा विषय असतो.आणि त्यात स्वतः घेतलेलं घर ही कौतुकाची बाब असते. आणि तेच स्वतःच घर घेण्याचा प्रत्येकाचा आपापला स्ट्रगल असतो. याच संदर्भातील ऋतुजाची सोशल मीडिया वरील एक पोस्ट लक्ष्यवेधी ठरली आहे. त्यात तिने अस म्हंटल आहे की, शाळेत असताना बाबा ५ रुपये पॉकेट मनी द्यायचे. ३ रुपये खर्च करून २ रुपये पिग्गी बँक मध्ये टाकायचे. ती सवय, स्वभाव, संयम, शिस्त,स्मॉल सॅक्रिफाईज ,आई बाबा आणि देवाची कृपा यामुळे हे शक्य झालं. असं कॅप्शन देत ऋतुजाने तिच्या नवीन घराचं रील शेअर केलं आहे.यात तिने तिच्या नवीन घराचे फोटोज, घरच्यांचे फोटो घराची किल्ली अशा अनेक गोष्टी ऍड केल्या आहेत. रील वरून ऋतुजाने नवीन घर घेतल्याचा अंदाज येत आहे.(Rutuja Bagwe)
हे देखील वाचा- अमिताभ बच्चन यांच्यामुळे या दोन जिवलग मित्रांमध्ये पडली फूट
या रील मध्ये ऋतुजाने असे हि म्हंटले आहे की “फ्लॅट मिळाला आता घर बनवायचंय” घराला घर पण हे घरातल्या माणसांनी तिथे निर्माण होणाऱ्या आठवणींनी येत. आता ऋतुजा तीच नवीन घर कस सजवते. तिच्या घरातला तो खास कोपरा कोणता असेल हि उत्सुकता आहे.
याच बरोबर ऋतुजा अनेक फोटोशूट्स हि करत असते.तिच्या या फोटोजना प्रेक्षक ही भरभरून प्रतिसाद देत असतात. त्याचबरोबर कलाकारही ऋतुजाच्या ह्या पोस्ट वर कमेंट करताना आपल्याला पाहायला मिळतात. तिच्या या ग्लॅमर्स त्याच सोबत ट्रेडिशनल अंदाजामुळे ती प्रेक्षकांच्या नजरेत राहते.(Rutuja Bagwe)
हे देखील वाचा- एकीकडे शॉर्ट कपडे, मिनी स्कर्ट्स आणि दुसरीकडे द्रौपदी म्हणून जुही चावला ने दिला नकार