Gayatri Datar Wedding : मराठी सिनेसृष्टीत कलाकार मंडळी एकापाठोपाठ एक लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. रुमानी खरे-स्तवन शिंदे, अपूर्वा गोरे-अंशुमन जोशी, विशाल निकम-अक्षया हिंदळकर, साक्षी महाजन ही कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकली. यापाठोपाठ आता आणखी एका अभिनेत्रीची लगीनघाई सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. ही अभिनेत्री म्हणजे गायत्री दातार. बरेच दिवसांपासून गायत्रीची लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळाल होतं. आता अभिनेत्रीच्या लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने सोशल मीडियावर खास फोटो शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली. प्रेमाच्या कबुलीनंतर अभिनेत्रीच्या लग्नाकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या.
गायत्रीच्या ग्रहमखचे फोटो समोर आले आहेत. सोशल मीडियावर गायत्री नेहमीच सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच तिने सोशल मीडियावर ग्रहमखचा फोटो शेअर केला आहे. समोर आलेल्या या फोटोमध्ये गायत्रीने डोक्याला मुंडावळ्या बांधलेल्या दिसत आहेत. सुंदर अशा काठपदरच्या साडीमध्ये नवरी मुलगी शोभून दिसत आहे. सिंपल लूकमध्ये गायत्री दिसली. या फोटोसह तिने ग्रहमख असं लिहिलं. याशिवाय लगीनघाईला सुरुवात झाली असल्याचंही तिने म्हटलं.
गायत्रीबरोबरचा तिच्या होणाऱ्या नवर्याच्या घरीही लगीनघाई सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. गायत्रीचा होणारा पती श्रीकांत चौरेनेही त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लग्नाच्या तयारीचा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी त्याने मुहूर्तमेढ विधीचा फोटो शेअर केला आहे. आणि हे फोटो त्याने गायत्रीला टॅग करत मुलाकडे तयार आहेत असं म्हणत चिडवलं आहे.
गायत्रीने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिच्या आयुष्यात ‘हिरोची एन्ट्री’ झाल्याचं सांगितलं होतं. सुरुवातीला तिनं आपल्या जोडीदाराचा चेहरा गुलदस्त्यात ठेवला होता, मात्र ख्रिसमसच्या दिवशी एक रोमँटिक व्हिडिओ शेअर करत तिने चाहत्यांची उत्सुकता संपवली. गायत्रीच्या होणाऱ्या पतीचे नाव श्रीकांत चव्हरे असे आहे. श्रीकांत हा ग्लॅमर विश्वातील नसला तरी तो उच्चशिक्षित आहे. श्रीकांतने देशातील नामांकित अशा IIT बॉम्बे मधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे.इतकंच नाही तर तो एक कुशल फोटोग्राफर असून त्याला ड्रोन फोटोग्राफीची विशेष आवड आहे. तर श्रीकांतला प्रवासाची प्रचंड आवड असून त्याने जगातील अनेक देशांत भ्रमंती केली आहे.




