मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पायाला दुखापत, शस्त्रक्रिया आणि…; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्री मालिकेतून घेणार ब्रेक?, मोठी अपडेट समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 24, 2026 | 1:55 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
kashmira kulkarni injured leg

पायाला दुखापत, शस्त्रक्रिया आणि…; 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेत्री मालिकेतून घेणार ब्रेक?, मोठी अपडेट समोर

kashmira kulkarni injured leg : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळत आहे. मालिकेतील काव्या-पार्थ आणि जिवा-नंदिनी या दोन जोड्यांनी तर रसिकांच्या मनात घर केलं आहे. इतकंच नाहीतर मालिकेत रम्या हे पात्रही तितकंच गाजलं. ज्ञानदा रामतीर्थकर, मृणाल दुसानिस, विवेक सांगळे आणि विजय आंदळकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका या मालिकेत आहेत. त्याचबरोर कश्मिरा कुलकर्णीनं ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेमध्ये रम्याची खलनायिकेची भूमिका साकारली आहे. काव्या प्रेग्नन्ट असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे रम्याच्या मनात तिच्याबाबत रा निर्माण झाला आहे. काही ना काही कारण काढून रम्या काव्याला त्रास देत असते.

अशातच आता रम्या ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अभिनेत्रीच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. आणि त्यावर तिला शस्त्रक्रिया सांगण्यात आली आहे. त्यामुळे आता अभिनेत्री मालिकेतून ब्रेक घेणार का?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर आता नुकत्याच इट्स मज्जा मराठीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – मराठी अभिनेत्रीची लगीनघाई, ग्रहमखचे फोटो समोर, होणाऱ्या नवऱ्यानेही लग्नविधीचे फोटो केले शेअर

कश्मिरा म्हणाली, “एसिअल कट आहे आणि डॉक्टरांनी सर्जरी सांगितली आहे. मला सेटवर खूप सपोर्ट करतायत. लागलेलं आहे हे कळल्यावर त्यांना लगेच रिपोर्ट्स पाठवले. सगळे खूप प्रेमाने काळजी घेतायत. एकतर बसून किंवा उभं राहून डायलॉग्स, असं सगळं चालू आहे. हालचाल नाही करता येत. पण, बऱ्याचदा आपण मानसिकरीत्या तयार असतो तेव्हा सगळं होतं नीट”. पुढे अभिनेत्रीला, मालिकेतून ब्रेक घेणार का? असं विचारलं असता कश्मिरा म्हणाली की, “अजून एक-दोन डॉक्टरांना विचारतेय. त्यांचंही जर तेच मत असेल तर मग मला ब्रेक घ्यावा लागेल. सर्जरी म्हटलं तर तीन, साडेतीन महिने मला त्यासाठी द्यावे लागतील. पण, तेवढं ऍडजस्ट करायला सांगणं मलाच योग्य वाटणार नाही”.

आणखी वाचा – “मला अस्वस्थ वाटतं”, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने ३० वर्षांनी मोडली NO KISSING SCENE पॉलिसी, म्हणाली…

‘कथानकाप्रमाणे गोष्टी पुढे घेऊन जायच्या असतात. त्यामुळे प्रेक्षकांना वाट बघत ठेवणं बरोबर नाही वाटत. कदाचित जर तसं झालं तर ब्रेक घेईन.’ असंही कश्मिरानं पुढे सांगितलं. त्यामुळे आता वैयक्तिक करणामुळे कश्मिरा म्हणजेच मालिकेतील रम्याने मालिकेतून एक्झिट घेतली तर कथानक कसं फिरणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Tags: kashmira kulkarnilagnanantr hoilach premmarathi serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Akshay Kelkar Father

अक्षय केळकरचे वडील आजही चालवतात रिक्षा, रिक्षाचालक आणि मराठी वादाबाबत म्हणाले, " इथे कमवता आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.