चेहऱ्यावरची गंभीरता पाहून व्यक्ती रागीट वाटणं स्वाभाविकच आहे. मात्र प्रत्यक्ष व्यक्तीची मुलाखत झाल्यांनतरच त्यांच्या स्वभावाची जाणीव होते हे ही तितकंच खरं आहे. हे सर्व बोलण्यामागचं कारण म्हणजे सलीम खान. सेलिब्रिटींच्या भेटीगाठी या पुस्तकात अनिता पाध्ये यांनी सलीम खान यांच्या स्वभावाचं अचूक वर्णन केलंय. त्यांनी सलीम खान यांच्या भेटीबद्दल सांगितलेल्या भागात एक उत्तम किस्सा मांडला आहे. तो ऐकून सलीम खान यांची बाजू घेऊन कधी कोणी बोललं असेल का ? त्यांच्या चेहऱ्यावर सतत जाणवणाऱ्या गंभीरतेने तरी वाचा फोडली असेल का ? असा प्रश्न मला त्या दिवशी संपूर्ण दिवस भेडसावत राहिला. सिनेविश्वात सलीम – जावेद या जोडीत फूट कशी पडली या प्रश्नाचं उत्तर मला अनिता पाध्ये यांच्या सेलिब्रिटींच्या भेटीगाठी या पुस्तकातील त्या किस्स्यात मिळालं. (salim khan amitabh bacchan)
पहा सलीमजी आणि जावेदजी यांच्यात फूट कशी पडली (salim khan amitabh bacchan)
निर्माता जी. पी. सिप्पी यांच्या ‘सीता और गीता’ या चित्रपटासाठी लेखन करत असताना त्यांची जावेद अख्तरशी जोडी जमली व दोघांनी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला. याच चित्रपटाच्या शीर्षक यादीमध्ये सलीम-जावेद हे नाव सर्वप्रथम एकत्र झळकलं. त्यानंतर या जोडीने अनेक यशस्वी चित्रपट लिहिले. ‘दीवार’, ‘शोले’, ‘त्रिशूल’, ‘चाचा भतीजा’, ‘डॉन’ अमिताभ बच्चन यांची अँग्री यंग मॅनची इमेज बनण्यामागे या जोडीचा फार मोठा वाटा आहे. सलीमजी कथा लेखनामध्ये पारंगत तर चटपटीत संवादलेखन करण्यामध्ये जावेद पारंगत होते. निर्मात्यांशी व्यावहारिक बोलणी करणं, भेटीगाठी करणं या गोष्टीसुद्धा सलीमजी तत्परतेने सांभाळत असत. ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटाचं स्क्रिप्ट लिहीत असताना हा चित्रपट अन्य कुणा निर्मात्याला देण्याऐवजी ‘मिस्टर इंडिया’ च्या भूमिकेमध्ये दमदार आवाजाचं वरदान लाभलेल्या अमिताभ बच्चनना घेऊन आपणच निर्माण करू, असं या जोडीने ठरवलं आणि तेच ही जोडी तुटण्याचं प्रमुख कारण ठरलं.

अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक यशस्वी चित्रपट केल्यामुळे मानधनाबाबत अडवणूक न करता ते आनंदाने चित्रपटात काम करण्यास राजी होतील, अशी सलीम-जावेद यांची अपेक्षा होती; पैशांविषयी बोलणी करण्याबाबत अमिताभ बच्चन यांच्याकडून हवतस उत्तर मिळत नसल्याने, तेव्हा भविष्यात अमिताभसह काम करायचं नाही, असं मत रागाच्या भरात जावेद अख्तर यांनी व्यक्त केल, तर चित्रपटसृष्टीमध्ये एकत्र काम करत असताना एखाद्या स्टारसह काम न करणे हे सलीमजींना योग्य वाटत नसल्याने अँग्री यंग मॅनला डोळ्यांसमोर ठेवून खास स्क्रिप्ट लिहायचं नाही, असा निर्णय सालीमजींनी घेतला आणि त्या गोष्टीला जावेद अख्तर यांनी त्यावेळी दुजोरा दिला;
====
हे देखील वाचा – खणाच्या कपड्यांत सजलं मायलेकींचं सौंदर्य
====
परंतु अमिताभ बच्चन यांच्याकडे होळी खेळण्यासाठी जावेद अख्तर गेले होते. त्यावेळी सलीम तुमच्यासह काम करू इच्छित नाही, असे कसलाही मागचा पुढचा विचार न करता अमिताभ यांना सांगितले. त्यावेळी जावेदजींनी सलीमजींना बळीचा बकरा बनवल. त्याचा परिणाम असा झाला की सलीम-जावेद ही जोडी विभक्त झाली आणि ‘यापुढे मी जावेदसह काम करणार’ असं त्याकाळात यशाच्या शिखरावर असलेल्या अमिताभ बच्चन यांनी चित्रपटसृष्टीमध्ये जाहीर केले. (salim khan amitabh bacchan)

त्यानंतर एकही निर्माता-दिग्दर्शक सलीमजींसह काम करण्यास तयार नव्हता. जावेद अख्तर यांच्यासह काम करत असताना निर्मात्यांबरोबर मीटिंग्ज करून नवे प्रोजेक्ट्स मिळवणं, आर्थिक व्यवहार सांभाळणं या गोष्टींचं भांडवल करत संपूर्ण चित्रपटसृष्टीमध्ये अशीही बातमी पसरवली की, चित्रपटाचं स्क्रिप्ट जावेदजी लिहीत असत, तर सलिमजी फक्त आर्थिक बाजू सांभाळत असत, हा केलेला आरोप सलीमजींच्या प्रतिभेवर, बुद्धिमत्तेवर भाष्य करणारा होता.
