‘सैराट’ चित्रपटातील ‘आर्ची’ या भूमिकेतून अवघ्या महाराष्ट्रभर लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. या चित्रपटामुळे तिचा चांगलाच चाहतावर्ग तयार झाला आहे. अशातच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा २’ या चित्रपटामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. या चित्रपटात तिची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या चित्रपटाबरोबरच तिच्या भूमिकेचही जोरदार कौतुक होत आहे. रिंकू ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. अशातच तिने शेअर केलेल्या एका फोटोमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.
अभिनेत्रीने तिच्या नवीन मोबाईलचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. आहे. रिंकूला तिच्या आई-बाबांनी नवीन आयफोन १५ प्रो मॅक्स हा महागडा मोबाईल दिला आहे. या नवीन मोबईलचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत तिने “या सरप्राइजसाठी आय लव्ह यू आई-बाबा” असं म्हटलं आहे. त्याचबरोबर या स्टोरीच्या पुढे आई-वडीलांबद्दल आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये आई-बाबा मुलीची काळजी घेताना दिसत आहेत आणि त्यावर लिहीलं आहे की, या पृथ्वीतलावर तुमच्या आई-बाबांपेक्षा अधिक प्रेम तुमच्यावर कोणीच करू शकत नाही.” यावरून तिचं आई-वडिलांवरील प्रेम दिसून येतं.

रिंकूचा सोशल मीडियावर चांगलाच चाहतावर्ग आहे. तिच्या अनेक फोटो व व्हिडीओला चाहते लाईक्स कमेंट्स करत प्रतिसाद देत असतात. तिच्या आगामी कामाबद्दल व दैनंदिन जीवनातील गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असते. नुकतंच तिने लाल साडीतले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात तिने हातात हिरव्या बांगड्या आणि केसांत गजरा असा मराठमोळा लूक केला आहे. तिच्या या फोटोला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
आणखी वाचा – ‘झिम्मा २’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड, प्रेक्षकांचाही तुफान प्रतिसाद, चार दिवसांतच कमावले इतके कोटी
दरम्यान, सैराटनंतर ‘झुंड’, ‘आठवा रंग प्रेमाचा’, ‘कागर’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारून तिने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याचबरोबर ‘हंड्रेड’ या वेबसीरिजद्वारे तिने ओटीटी क्षेत्रातदेखील पदार्पण केले. ‘झिम्मा २’ मुळे पुन्हा पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे.