रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘धर्मवीर २’च्या चित्रीकरणाला सुरुवात, दिघेंच्या आश्रमात प्रसाद ओकसह कलाकारांची गर्दी, एकनाथ शिंदेंची कारकिर्द दिसणार?

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 27, 2023 | 2:38 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
marathi movie dharmaveer part 2 muhurta ceremony done in thane anandashram with prasad oak and pravin tarade

‘धर्मवीर २’च्या चित्रीकरणाला सुरुवात, दिघेंच्या आश्रमात प्रसाद ओकसह कलाकारांची गर्दी, एकनाथ शिंदेंची कारकिर्द दिसणार?

दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित गेल्या वर्षी ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक कोटी रुपयांची कमाई करत नवीन विक्रमदेखील केला. धर्मवीरच्या भरघोस यशानंतर धर्मवीरच्या दुसऱ्या भागाची चांगलीच चर्चा रंगली होती. दरम्यान ही चर्चा आता प्रत्यक्षात उतरण्यास सज्ज झाली आहे असं म्हणायला हरकत नाही.

धर्मवीरच्या निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वीच ‘धर्मवीर २’ ची घोषणा केली होती. त्यानंतर हा चित्रपट अखेर कधी सुरू होणार याची उत्सुकता लागली होती. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी आता ‘धर्मवीर २’ या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला आहे. ठाण्यातील आनंदाश्रमात हा मुहूर्त सोहळा पार पडला. निर्माते सचिन जोशी व मंगेश देसाई यांच्यामार्फत या मुहूर्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा मुहूर्त सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.  

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – …अन् थेट लंडनच्या पॅलेसमध्ये बसून वैशाली सामंतने खाल्ली मिसळ, फोटो शेअर करत म्हणाली, “ना नाशिक, कोल्हापूर अन्…”

या मुहूर्तावेळी मंगेश देसाई व प्रवीण तरडे यांच्यात मजामस्तीदेखील झाली. यावेळी मंगेश तरडे यांना मस्करीत “तरडे तुमचा लय मोठा परडे” असं म्हणतात. यावर उपस्थितांसह प्रवीण तरडेदेखील हसतात आणि “परडे वर येऊ नका” असं गंमतीत म्हणतात. दरम्यान या मुहूर्ताला अभिनेता प्रसाद ओक, स्नेहल तरडे, महेश लिमये, मंगेश कुलकर्णी  यांच्यासह चित्रपटातील इतर कलाकारांनीदेखील हजेरी लावली होती.

आणखी वाचा – ‘झिम्मा २’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड, प्रेक्षकांचाही तुफान प्रतिसाद, चार दिवसांतच कमावले इतके कोटी

दरम्यान, धर्मवीर चित्रपटानंतर राज्यात अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली आणि या स्थित्यंतरामागे या चित्रपटाने महत्वाची भूमिका बजावली होती. अशातच आज ‘धर्मवीर २’ चा मुहूर्त सोहळा पार पडला आहे. त्यामुळे लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. तसेच या दुसऱ्या भागात प्रेक्षकांना नक्की काय पाहायला मिळणार आणि हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार? याविषयीदेखील उत्सुकता निर्माण झाली आहे.        

Tags: dharmaveerdharmaveer 2entertainment newsmarathi actormarathi entertainmentmarathi movieprasad oakpravin tarde
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
marathi actress rinku rajguru parents gave her new mobile iphone 15 pro max photo shared on instagram story

रिंकू राजगुरुला आई-वडिलांनी दिलं महागडं गिफ्ट, अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली, "या सरप्राइजसाठी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.