शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मराठी मालिकांमध्ये काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन, हेमांगी कवी म्हणते, “तुझ्यासाठी मोठा धक्का…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 9, 2023 | 6:07 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
hari narke death

मराठी मालिकांमध्ये काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन, हेमांगी कवी म्हणते, “तुझ्यासाठी मोठा धक्का...”

Hari Narke Passed Away : ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचं आज निधन झालं. ते ६० वर्षांचे होते. एशियन हार्ट रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु असताना हरी नरके यांनी अखेरचा श्वास घेतला. ते समता परिषदेते उपाध्यक्ष होते. मुंबईमध्ये समता परिषदेची १० ऑगस्टला (गुरुवार) बैठक होती. त्यासाठी ते आज पुण्याहून मुंबईला येणार होते. मात्र पहाटे त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. सतत होणाऱ्या त्रासामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं.

हरी नरके यांना उलट्यांचा त्रासही होत होता. दरम्यान रुग्णालयामध्य नेल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. उपचारादरम्यानच त्यांचं निधन झालं. फुले व आंबेडकर यांचे विचार व कार्य सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हरी नरके यांनी केलं. शिवाय शासकीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या निर्णयांमध्ये हरी नरके यांचा खारीचा वाटा होता.

आणखी वाचा – “आनंद दिघेंच्या नावावर सहानुभूती…” ‘धर्मवीर २’बाबत प्रसाद ओकने पोस्ट शेअर करताच नेटकऱ्यांच्या कमेंट, म्हणाले, “एकनाथ शिंदे पुन्हा…”

हरी नरके यांच्या निधनानंतर अजित पवार तसेच इतर राजकीय मंडळींनी श्रद्धांजली वाहिली. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत काम करणारी अभिनेत्री प्रमिती नरके ही त्यांची मुलगी. वडिलांच्या निधनानंतर तिने बाबांबरोबरचा तिचा लहानपणीचा फोटो शेअर केला. शिवाय हेमांगीनेही हरी नरके यांना श्रद्धांजली वाहिली.

आणखी वाचा – “आई-वडिलांचा घटस्फोट झाला अन्…”, आमिर खानच्या लेकीचा आजारपणाबाबत मोठा खुलासा, म्हणाली, “माझ्या आजारासाठी ”

View this post on Instagram

A post shared by Pramitee Preet (@pramitee_)

आणखी वाचा – नितीन देसाईंच्या लेकीला त्यांचा वाढदिवस साजरा करायचा होता पण…; जवळच्या मित्राचा मोठा खुलासा, म्हणाला, “मी मुख्यमंत्र्यांना…”

हेमांगी म्हणाली, “हरी नरके सारख्या व्यक्तींच्या जाण्याने फक्त त्यांच्या घरातल्यांचं नाही तर अख्ख्या समाजाचं नुकसान होतं. सर तुम्हाला भेटायचं राहून गेलं. पण तुमचे विचार, तुमचा अभ्यास, तुमची पुस्तकं कायम मार्गदर्शक ठरतील. प्रमिती तुझ्यासाठी हा किती मोठा धक्का असू शकतो याची मला कल्पनाही करवत नाही. तू तुझी काळजी घे. बाबांच्या विचारांची, कार्याची ज्योत तेवत ठेवायची आहे.” प्रमितीनेही इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे दुःख व्यक्त केलं आहे.

Tags: entertainment newsmarathi actressmarathi serial
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Gautami And Madhuri Dance Video Viral

टाळ्या, शिट्ट्या अन्…; कोण कोणावर भारी? एकाच मंचावर गौतमी पाटील व माधुरी पवारची लावणी, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.