कलाकार कोणाला डेट करत आहे, त्यांचे अफेअर याबाबत नेहमीच विविध चर्चा रंगतात. असंच काहीसं पूजा सावंतबाबतही घडताना दिसलं. तिचं नाव काही कलाकारांबाबत जोडलं गेलं. मात्र पूजाने याबाबत उघडपणे भाष्य करत कोणत्याही अभिनेत्याबरोबर नातं असल्याचं सांगितलं. ते अगदी खरंही ठरलं. काही दिवसांपूर्वीच तिने चाहत्यांना एक सुखद धक्का दिला. सोशल मीडियावर ‘आमचं ठरलं’ म्हणत तिने प्रेमाची कबुली दिली. तिने तिचा जोडीदार सिद्धेश चव्हाणबरोबर फोटो शेअर केला. त्यानंतर लग्नही करणार असल्याचं तिने जाहिर केलं. आता तिच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे.
पूजा व सिद्धेश लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यापूर्वी तिच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांचे बरेच फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पूजा व सिद्धेशचा संगीत सोहळ नुकताच पार पडला. या सोहळ्याचे बरेच व्हिडीओ आता समोर आले आहेत. दरम्यान या कार्यक्रमात पूजा-सिद्धेशने धमाल डान्स केला. शिवाय एकमेकांच्या प्रेमामध्ये आकंठ बुडालेले दिसले. पण दोघांचेही कुटुंबीय यामध्ये कुठेच मागे नव्हते. प्रत्येकाने डान्स करत सगळ्यांनाच सरप्राइज दिलं.
आणखी वाचा – तितीक्षा तावडेच्या हातावर रंगली सिद्धार्थ बोडकेच्या नावाची मेहंदी, नवरीबाईचा उत्साह, जय्यत तयारी अन्…
पूजाच्या आईने तसेच तिच्या होणाऱ्या सासूबाईंनी एकत्र धमाल नृत्य केलं. तर पूजाच्या भावंडांनी या संगीत सोहळ्यामध्ये दंगा केला. पूजाची बहीण रुचीराच्या डान्सने तर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तर पूजा-सिद्धेशचे आई-बाबांनीही सुंदर नृत्य सादर केलं. यावेळी दोन्ही कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. तर कलाकार मंडळींनी हजेरी लावत या कार्यक्रमाला चारचाँद लावले.
प्रार्थना बेहरे, अमृता खानविलकर, मेधा मांजरेकर, पुष्कर जोग, भार्गवी चिरमुले, वैभव तत्त्ववादी यांसारखी अनेक मंडळी पूजा-सिद्धेशच्या संगीत सोहळ्यासाठी उपस्थित होते. पूजाने यावेळी परिधान केलेला लेहंगा विशेष लक्ष वेधून घेत होता. तर सिद्धेशचा शेरवानी लूकही चर्चेचा विषय ठरला. यापूर्वी संगीत सोहळ्यासाठी रिहर्सल करतानाचे बरेच फोटो व व्हिडीओ पूजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले होते. २८ फेब्रुवारीला दोघांचा विवाहसोहळा पार पडला असणार असल्याचं बोललं जात आहे.