Prathamesh Parab Kshitija Ghosalkar Marriage : ‘टाइमपास’ चित्रपटातून खरं प्रेम करायला शिकवणारा दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परब नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. प्रथमेशला त्याच्या आयुष्यातील पराजू मिळाली आहे. म्हणजेच प्रथमेश नुकताच गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरबरोबर विवाहबंधनात अडकला आहे. गेले काही दिवस प्रथमेश-क्षितिजा यांच्या लग्नाची बरीच चर्चा रंगली होती आणि शेवटी हे दोघे विवाहबंधनात अडकले आहेत. जवळचे नातेवाईक व कुटुंबियांच्या उपस्थितीत प्रथमेश-क्षितिजा यांचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. प्रथमेश-क्षितिजा यांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
प्रथमेशने त्याच्या लग्नासाठी सफेद रंगाचा कुर्ता, त्यावर गुलाबी रंगाचं पीतांबर अन् मराठमोळा फेटा असा लूक केला होता. तर प्रथमेशच्या बायकोने लग्नसाठी गुलाबी रंगाचा भरजरी काठ असलेली पिवळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती आणि त्यावर डिझाइनर असा ब्लाऊज परिधान केला होता. तसेच तिने घातलेल्या मोत्यांच्या दागिन्यांमुळे क्षितिजा खूपच सुंदर दिसत होती.
आणखी वाचा – प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकरचा विवाहसोहळा संपन्न, मराठमोळ्या पद्धतीने पार पडलं लग्न, साधेपणाने वेधलं लक्ष
प्रथमेश-क्षितिजा यांच्या या हटके लूकसह क्षितिजाच्या मंगळसूत्रानेदेखील चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे. क्षितिजाच्या मॉडर्न डिझाईन असलेल्या मंगळसूत्रात काळ्या मण्यांनादेखील तितकेच महत्त्वाचे स्थान दिले असल्याचे पाहायला मिळत आहे. क्षितिजाचे मंगळसूत्र हे मॉडर्न असले तरी त्याला पारंपरिकतेचादेखील तितकाच साज आहे. त्यामुळे क्षितिजाचे पारंपरिक तरीही मॉडर्न डिझाईन असलेलं मंगळसूत्र अनेकांना आवडले असल्याचे म्हटले आहे.
आणखी वाचा – लग्न लागताच बायकोच्या पाया पडला प्रथमेश परब, पत्नीनेही नमस्कार केला अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल
दरम्यान, प्रथमेश-क्षितिजा यांनी “Lockdown love story चे Hearts, forever साठी locked” असं म्हणत त्यांच्या लग्नाचे हे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्रथमेश-क्षितिजा यांच्या या फोटोला लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच चाहत्यांसह अनेक कलाकार मंडळींनी प्रथमेश-क्षितिजा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.