बऱ्याचदा कलाकार त्यांच्या लूकवरून ट्रोल होताना दिसतात. विशेष म्हणजे बिकिनीचा वाद तर फारच जुना आहे. शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटातील अभिनेत्री दीपिका पादुकोण तर एका गाण्यावरून ट्रोल झाली होती. त्यात तिने घातलेली भगव्या रंगाची बिकिनी तर देशभरात वादाचा विषय ठरली होती. जशा हिंदी अभिनेत्री बिकिनी लूकमुळे ट्रोल होतात. त्यात मराठी कलाकारांनी बिकिनीत पोस्ट केलेले फोटो नेहमी ट्रोलर्सच्या निशाण्यावर असलेले पाहायला मिळतात. (Mitali mayekar bikini photo troll)
याआधी अभिनेता सचिन पिळगांवकरांची लेक श्रिया पिळगांवकरही तिच्या बोल्ड लूकचा फोटो शेअर केल्यामुळे ट्रोल झाली होती. अभिनेत्री प्रार्थना बेहरेला मोनॉकिनीमध्ये पोस्ट केलेल्या फोटोमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आता अभिनेत्री मिताली मयेकरनेही बिकिनीतील फोटो शेअर केले आहेत. त्यावर नेटकऱ्यांनी देखील मराठी संस्कृतीवरून तिला ट्रोल करत आहेत.
मितालीने याआधीही बिकिनीतील फोटो पोस्ट केले होते. त्यावेळी तिने फोटोला दिलेलं कॅप्शन बरंच चर्चेत होतं. मला आपली संस्कृतीचं ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नका असा सल्लाही तिने कमेंट मधून दिला होता. आता पुन्हा एकदा तिने बिकिनीमध्ये फोटो शेअर केले आहेत. मिताली सध्या बालीमध्ये मजा-मस्ती करताना दिसत आहे. नुकताच तिने बालीच्या समुद्रावर सर्फिंगचा आनंद लूटला आहे. त्यावेळचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर करत ‘Sunset surfing’ असं कॅप्शन दिलं.

आणखी वाचा – गौतमी पाटीलला कोकणात प्रवेश नाही, कार्यक्रमाला विरोध, पण यामागचं नेमकं कारण काय?
मितालीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी संमिश्र कमेंट केले आहेत. काहींनी तर मितालीला बिकिनीवरून ट्रोलही केलं आहे. एका नेटकऱ्याने तर, ‘वाटोळे करा मराठी संस्कृतीचे’, असं म्हणत कमेंट केली. तर दुसऱ्या नेटकऱ्याने ‘मराठी असण्याला कलंक आहे’, असं म्हणत तिच्या फोटोवर कमेंट केली आहे. तर काहींनी मितालीच्या या लूकला पसंती दर्शवत तिच्या बाजूने कमेंट केली आहे. ‘तुला स्वातंत्र्य आहे, तूच ठरव कोणते कपडे घालायचे आणि कोणते नाही. बाकीच्यांना काय बोलायचे ते बोलू दे. तू तुझं सुरू ठेव’, असं म्हणत तिला पाठिंबा दर्शवला आहे.