बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मराठमोळ्या अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केलं नवं घर, गृहप्रवेशासाठी एकत्र आलं कुटुंब, पाहा Inside Photo

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 3, 2025 | 5:59 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Meera Joshi new home

मराठमोळ्या अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केलं नवं घर, गृहप्रवेशासाठी एकत्र आलं कुटुंब, पाहा Inside Photo

Meera Joshi new home : प्रत्येक कलाकाराचं काही ना काही असं स्वप्न असतं आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण अहोरात्र झटत असतो. कुणाचाही वारसा हक्क नसतानाही स्वतःच्या मेहनतीवर उभं राहणं सोपं नसतं. पण जेव्हा मनात प्रचंड जिद्द आणि स्वप्नं पूर्ण करण्याची इच्छा असते, तेव्हा आयुष्यात अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. जसं की, कलाकार मंडळी स्वतःचं घर घेण्याचं, गाडी घेण्याचं स्वप्न पाहतात आणि त्यासाठी दिवस-रात्र मेहनत करतात. अशीच मेहनत करुन, आपलं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलंय सुप्रसिद्ध अभिनेत्री मीरा जोशी हिने. होय. मीराने अखेर मुंबईत स्वतःचं घर घेतलं असून, तिचं हे स्वप्न साकार झालं आहे.

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर तिने तिच्या नव्या घरात पूजा केली असल्याचं समोर आलं आहे. नव्या घराचा व्हिडीओ शेअर करत मीराने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “१३ हा नंबर माझ्या खूप जवळचा आहे. माझी जन्मतारीख १३. माझ्या फ्लॅटचा फ्लोअर क्रमांक १३ च आणि फ्लॅट नंबरसुद्धा १३ च. हा निव्वळ योगायोग नाही; जणू काही युनिव्हर्स मला येथे आणण्यासाठी एकवटलं होतं असं म्हणावं लागेल. म्हाडाने हे सगळं गणित जुळवून आणल्या बद्दल आभार. मुंबईत फ्लॅट असावा हे स्वप्न मी गेली पंधरा वर्षे उराशी बाळगून होते. कारण हीच आता माझी कर्मभूमी आहे. १५ वर्षांपूर्वी मुंबईत आले. मुंबईने आपलंसं केलं. अर्थात मुंबई सर्वांनाच आपलं करुन घेते. इतकी वर्षे भाड्याच्या घरात राहिले. भाड्याच्या घरातही चांगले दिवस गेले. कोणत्याच घरमालकाने कधी खाली करा सांगितले नाही. पण स्वतःचं असं एक घर असावं असं कोणाला वाटत नाही”.

आणखी वाचा – “आज एक महिना झाला”, प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनू मोघेची पहिली पोस्ट, म्हणाला, “मनं पोखरलं आहे आणि…”

View this post on Instagram

A post shared by Meera Joshi (@meerajoshi_)

पुढे तिने लिहिलं, “माझा स्वभाव उधळा नसल्याने माझं पंधरा वर्षांच थोडंफार सेविंग होतं. माझ्या दादाचा योग्य सल्ला असल्याने पै आणि पै अगदी योग्य ठिकाणी सेव झाली होती. पण ती रक्कम एक फ्लॅट घेण्यासाठी पुरेशी नव्हती. फ्लॅट घेण्यासाठी पालक देऊ करत असलेली मदत मी नम्रपणे नाकारली खरी पण अडचण अशी आली की या क्षेत्रामधील लोकांना बँका लोन देत नाहीत. कारण आमचा ठोस असा इन्कम नसतो. मग बाबांनी माझं फर्स्ट नाव आणि त्यांचं सेकंड नाव असे महाराष्ट्र बँकेचे होम लोन करून दिले. फायनली माझं आज घर झालं. खरंतर हे माझे वर्ष धाडसाचं होतं. चॅलेंजिंग होतं. स्वप्नांना योग्य दिशा देणार होतं म्हटलं तरी चालेल. माझं प्रॉडक्शन हाऊस ’कृष्णसखी’ मी याच वर्षी सुरु केलं आणि घर घेण्याचा योग सुद्धा याच वर्षी आला. माझ्या आईने नेहमीच माझ्यावर विश्वास दाखवला, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूल्यांशी कोणतीही तडजोड न करता स्वतःच्या अटींवर काम करण्यास प्रवृत्त करणं असो”.

आणखी वाचा – अखेर जयंतच सत्य समोर, जान्हवी घेणार मोठा निर्णय; तर सिद्धू होणार किडनॅप, मोठा ट्विस्ट

“माझ्या आईमुळेच रत्नागिरीतील एक मुलगी स्वप्नांच्या शहरात मोठी स्वप्ने पाहू शकली. अर्थात प्रत्येक प्रोफेशन मध्येच आपापल्या परीने संघर्ष असतो. तसा तो मी पण केला त्यात काही मोठे केलं असं मला वाटत नाही. माझे आई-बाबा, माझा दादा, माझा मित्र दुर्गेश, माझा गोट्या मामा, पूनम मामी आणि माझ्यावर प्रेम करणारे आपण सर्व प्रेक्षक माय बाप या सर्वांचे आभार माझ्या चढत्या आलेखासाठी. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, माझी काळजी घेतल्याबद्दल आणि चढ-उतारांमध्ये मला मार्गदर्शन केल्याबद्दल मी देवाचे आभार मानते. तो माझ्यासोबत सदैव असणार आहे मला त्याची खात्री आहे”. मीराच्या या पोस्टवर तिला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: marathi actressmeera joshinew home
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
Prajakta Gaikwad wedding

प्राजक्ता गायकवाडच्या लग्नाची तारीख अखेर जाहीर, लग्नपत्रिकाही सोशल मीडियावर व्हायरल, नक्की कुठे पार पडणार सोहळा?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.