सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अखेर जयंतच सत्य समोर, जान्हवी घेणार मोठा निर्णय; तर सिद्धू होणार किडनॅप, मोठा ट्विस्ट

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 30, 2025 | 5:55 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Lakshmi Niwas upcoming twist

अखेर जयंतच सत्य समोर, जान्हवी घेणार मोठा निर्णय; तर सिद्धू होणार किडनॅप, मोठा ट्विस्ट

Lakshmi Niwas upcoming twist : ‘लक्ष्मी निवास’ ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. मालिकेच्या सध्याच्या ट्रॅकने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं आहे. मालिकेत जान्हवी-जयंतसह भावना-सिद्धूची जोडीही प्रेक्षकांच्या मनात घर करुन बसली आहे. सध्या मालिकेत लक्ष्मी आणि श्रीनिवासची मुले एकमेकांशी भांडत आहेत, तर एकीकडे गाडे पाटीलांच्या घरी भावना त्रास देण्यासाठी आजी कारस्थान करत आहे. त्याचबरोबर जयंत जान्हवीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. दरम्यान झी-मराठी वाहिनीने नवा प्रोमो समोर आणला आहे. त्यात सिद्धू आणि भावना नवरात्री उत्सवात गेले आहेत.

सिद्धू व भावना एका ठिकाणी बसलेले असताना, त्याचे मित्र त्याला फिरायला बोलवतात. यावर भावना सिद्धूला विचारते, “कुठे चालात?” सिद्धू उत्तर देतो, “रात्रभर ज्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी घडतात… जसं की पोरे दारू पिऊन दंगा करतात, मुलींची छेडछाड करतात. आम्ही गस्त घालतो आणि त्या सर्व चुकीच्या गोष्टी थांबवतो. त्याचबरोबर रवीही त्या उत्सवाच्या ठिकाणी आला असल्याचं दिसतं. तो मनात म्हणतो, “जसा राजाचा जीव पोपटात अडकलेला असतो, तसा भावनाचा सिद्धूमध्ये अडकलेला आहे. आता सिद्धूला पिक्वचरमधून काढलं पाहिजे”.

आणखी वाचा – “एका स्त्रीला दुखावेल तो कधीही आनंदी होणार नाही”, गोविंदाबरोबरच्या नात्यावर सुनीता अहुजा स्पष्टच बोलली, म्हणाली, “खूप संताप…”

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

काही क्षणांनंतर काही लोक सिद्धूला किडनॅप करताना दिसतात. प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की जयंत सचिनला सांगतो, “व्येंकीच अर्जुन आहे, हे मला बरंच नंतर कळलं.” सचिन उत्तर देतो, “अरे, तुझ्यामुळेच अर्जुनचा आवाज गेला. तू त्याला बोअरवेलच्या खड्ड्यात ढकललं होतं.” हे ऐकून जयंत शांतच होतो. आणि नेमकं हे बोलणे जान्हवी ऐकते, आणि तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. तिने जे काही ऐकलं ते नेमकं काय आहे ही भीती तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते, आणि डोळ्यांत अश्रूही दिसतात.

आणखी वाचा – हॉस्पिटलमध्ये ओळख, १५ वर्षांचं अंतर ते लग्न; सयाजी शिंदेंची हटके लव्हस्टोरी, पहिली भेट…

तर आता खरी उत्सुकता अशी आहे की, जान्हवी कोणता निर्णय घेईल? आणि सिद्धूच्या जीवाचा धोका असलेला प्रसंग कळल्यावर भावना काय करेल? हे पाहणं निश्चितच प्रेक्षकांसाठी मनोरंजक ठरणार आहे.

Tags: lakshmi niwasmarathi serialzee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Next Post
Priya Marathe cancer death

"आज एक महिना झाला", प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनू मोघेची पहिली पोस्ट, म्हणाला, "मनं पोखरलं आहे आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.