शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आज एक महिना झाला”, प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनू मोघेची पहिली पोस्ट, म्हणाला, “मनं पोखरलं आहे आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 1, 2025 | 10:39 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Priya Marathe cancer death

"आज एक महिना झाला", प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनू मोघेची पहिली पोस्ट, म्हणाला, "मनं पोखरलं आहे आणि…"

Priya Marathe cancer death : कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिचं वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी निधन झाले. अचानक निधन झाल्याच्या बातमीने संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला होता. प्रिया कित्येक वर्ष कर्करोगाशी झुंज देत होती. यावेळी तिचा पती अभिनेता शंतनू मोघे याने तिची साथ दिली. प्रियाच्या निधनानंतर अभिनेता शंतनू मोघेने प्रियासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी भावना व्यक्त करत म्हटलं, “ही एक अतिशय खास कृतज्ञता पोस्ट आहे”. यापूर्वी शंतनूने प्रियाच्या निधनाबाबत कोणतीही पोस्ट शेअर केली नव्हती. अखेर तिच्या निधनाला महिना होताच या पोस्टद्वारे शंतनू व्यक्त झाले आहेत.

त्यांनी इंस्टाग्रामवर प्रियाबरोबरचे फोटो शेअर करत असं म्हटलं की, “फोन कॉल्स, ई-मेल्स, व्हॉट्सअॅप, एक्स (ट्विटर), इंस्टाग्राम, फेसबुक अशा सगळ्या वेगवेगळ्या माध्यमांमधून आपल्या मनातील प्रेम, आपुलकी, शुभेच्छा आणि आशीर्वाद आमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या प्रत्येकाचं मनापासून आभार. कुटुंबीय, मित्रमैत्रिणी, चाहते, फॉलोअर्स, परिचित किंवा अगदी अनोळखी लोकसुद्धा सगळ्यांनी इतक्या मनापासून भावना व्यक्त केल्या. तुमचं ऊबदार प्रेम, खरं-खरं जाणवणारं दुःख आणि खरी काळजी ही कुठल्याही शंकेशिवाय आमच्यापर्यंत पोहोचली.

आणखी वाचा – अखेर जयंतच सत्य समोर, जान्हवी घेणार मोठा निर्णय; तर सिद्धू होणार किडनॅप, मोठा ट्विस्ट

View this post on Instagram

A post shared by Shantanu S. Moghe (@shantanusmoghe)

देशभरातून, जगभरातून मिळालेले आशीर्वाद आणि शुभेच्छा यांनी पुन्हा एकदा मानवतेवरचा आमचा विश्वास अधिक दृढ केला. देवा सगळ्यांना सुखी ठेव. आज प्रियाला जाऊन एक महिना पूर्ण झाला. आमचं वैयक्तिक दुःख आणि वेदना शब्दांत मांडणं खरंच अशक्य आहे. इतक्या लवकर, अन्यायकारक, अनपेक्षित आणि नको असलेल्या या निरोपामुळे मन आतून पोखरून गेलं आहे. पण तिनं आपल्या कामातून, कलेतून, प्रेमातून, काळजीतून, दयाळूपणातून, वागण्या-चालण्यातून, संवेदनशीलतेतून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृतीतून व तिच्या सुंदर “वाइब्स”मधून हजारो-लाखो हृदयांना स्पर्श करुन ठेवलं आहे.

आणखी वाचा – “एका स्त्रीला दुखावेल तो कधीही आनंदी होणार नाही”, गोविंदाबरोबरच्या नात्यावर सुनीता अहुजा स्पष्टच बोलली, म्हणाली, “खूप संताप…”

आज पुन्हा एकदा मनापासून आभार प्रत्येकाचे… नेहमीच आमच्या सोबत उभे राहिल्याबद्दल, दुःखात-सुखात हात दिल्याबद्दल. तुमच्यावर खूप प्रेम, खूप शुभेच्छा. मनःपूर्वक आभार. देवा, एक चूकही नको आता… तिची नीट काळजी घ्यावी, तिला प्रेम द्यावं – अन्यथा आम्ही माफ करणार नाही. ती माझी देवदूत आहे… पुन्हा भेटू तोपर्यंत”, अशा शब्दात त्याने भावना व्यक्त केल्या आहेत. शंतनूच्या या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव झालेला पाहायला मिळाला आहे.

Tags: Marathi newspriya marathe deathShantanu moghe
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Balika Vadhu actress wedding

'बालिका वधू' फेम अभिनेत्रीचा शाही विवाहसोहळा, 'पती पत्नी और पंगा'च्या सेटवर पार पडलं लग्न, फोटो समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.