Prajakta Gaikwad wedding : काही दिवसांतच दिवाळी आहे. आणि एकदा का दिवाळी संपली की लग्नसराई सुरु झालेली पाहायला मिळेल. अशातच अनेक कलाकार मंडळीही आहेत जे लग्नबंधनात अडकणार आहेत. धुमधडाक्यात साखरपुडा केल्यानंतर ही मराठी कलाकार आता सात फेरे घेणार आहेत. अशातच मराठी सिनविश्वातील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड केव्हा लग्नगाठ बांधणार आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. आता तिच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी फेम’ अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिचा साखरपुडा काही दिवसांपूर्वीच झाला त्यानंतर आता लवकरच अभिनेत्री विवाहबंधनात अडकणार आहे.
प्राजक्ता आणि शंभूराज खुटवड यांचा साखरपुडा ७ ऑगस्ट २०२५ पुण्यात थाटामाटात पार पडला होता. जून महिन्यातच प्राजक्तानं लग्नाबद्दल हिंट दिली होती. तेव्हापासून ती कोणाशी लग्नगाठ बांधणार हे जाणून घेण्याची उत्सुकता लागून राहिली होती. आणि अखेर साखरपुड्यादिवशी प्राजक्ताने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटो दाखविला. यापूर्वी प्राजक्ताचा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झाला ते फोटो पाहूनच साऱ्यांना नेमकं काय सुरु आहे याची उत्सुकता लागून राहिली होती.
आणखी वाचा – मराठमोळ्या अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केलं नवं घर, गृहप्रवेशासाठी एकत्र आलं कुटुंब, पाहा Inside Photo
आता प्राजक्ता आणि शंभूराज यांच्या विवाहची तारीख समोर आली असून लग्नाची पत्रिका व्हायरल होत आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर लग्नपत्रिका पूजनाची पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधील व्हिडीओनुसार लग्नसोहळा २ डिसेंबर मंगळवारी, दुपारी १२ वाजून २४ मिनिटांनी पार पडणार असल्याचं समोर आलं आहे. गुलाबाच्या पाकळ्या, अक्षता, मोराचे पीसचा वापर करत लग्नपत्रिकेच्या व्हिडीओसाठी खास सजावट केली असल्याचं पाहायला मिळालं.
आणखी वाचा – ‘बालिका वधू’ फेम अभिनेत्रीचा शाही विवाहसोहळा, ‘पती पत्नी और पंगा’च्या सेटवर पार पडलं लग्न, फोटो समोर
प्राजक्तानं लग्नपत्रिका पूजनाचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांसह आणि नेटकऱ्यांसह लग्नाची तारीख शेअर केली आहे. हा विवाहसोहळा पुण्यात पार पडणार असल्याचं म्हटलं जात आहे. प्राजक्ताचा होणारा पती शंभूराज खुटवड उद्योगपती तसंच पैलवान आहे. खुटवड कुटुंब राजकारणातही सक्रिय आहे. त्यामुळं आता प्राजक्ता एका राजकीय कुटुंबाची सून होणार आहे. आता प्राजक्ताच्या शाही साखरपुड्यानंतर तिच्या शाही विवाहसोहळ्याची झलक पाहणं रंजक ठरणार आहे.





