बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्याचं डोकं फाटलं, माझ्या डोक्याला…”, एकदा नव्हे तर दोनवेळा मानसी नाईकला मृत्यूने गाठलं, म्हणाली, “मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 18, 2023 | 1:57 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Manasi naik car accident

“त्याचं डोकं फाटलं, माझ्या डोक्याला...”, एकदा नव्हे तर दोनवेळा मानसी नाईकला मृत्यूने गाठलं, म्हणाली, “मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर...”

आपल्या नृत्याने प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री व नृत्यांगणा म्हणजे मानसी नाईक. मानसी सध्या कलाक्षेत्रापासून दूर असली तरी सोशल मीडियावर तिचे विविध व्हिडीओ व्हायरल होतान दिसतात. रिल व्हिडीओमध्ये डान्स करत ती प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. शिवाय मानसी सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. ती तिच्या घटस्फोटाच्या प्रकरणामधून बाहेर पडली आहे. पण या कठीण काळात तिला मोठ्या अपघाताला सामोरं जावं लागलं.

भार्गवी चिरमुलेच्या पॉडकास्टमध्ये मानसीने हजेरी लावली होती. यावेळी तिने तिच्या संपूर्ण प्रवासाबाबत भाष्य केलं. तसेच तिच्या खासगी आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. मुलाखतीदरम्यान भार्गवीने तिला तिच्या अपघाताबाबत सांग असं म्हटलं. यावेळी मानसीने तिचा एकदा नव्हे तर दोनवेळा पूर्नजन्म झाला असल्याचं सांगितलं. दोनवेळा मोठ्या अपघातामधून बाहेर पडली असल्याचं मानसीने यावेळी उघड केलं.

आणखी वाचा – चकवा लागला, स्मशानभूमी दिसताच…; सिंधुदुर्गला जाताना कोकण हार्टेड गर्लला आला भयावह अनुभव, म्हणाली, “गगनबावडा घाटामधून…”

मानसी म्हणाली, “माझा खरंतर पुर्नजन्मच आहे. फक्त एकदा नाही दोनवेळा माझा अपघात झाला. सध्या माझं जे काही प्रकरण सुरु आहे (घटस्फोटाचं) त्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर माझा अपघात झाला होता. त्यावेळी माझी संपूर्ण टीमही माझ्याबरोबर होती. एक्सप्रेस हायवेवर जे कोणी काम करणारे होते किंवा वैद्यकीय उपचार करणारे होते ते माझ्यासाठी लगेच धावून आले. माझ्या डोळ्याला लागलं. पण स्वामींची कृपा की मी डोळे बंद केले होते. त्यामुळे मी वाचले. माझ्या टीममधील भारतीला जोरात लागलं होतं. तिचा गाल सुजला होता. रात्रीचा प्रवास खरंच करु नये. कारण ड्रायव्हरला झोप लागते”.

आणखी वाचा – Video : प्रसाद-सई ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर काय खातात?, व्हिडीओमध्ये दिसल्या दोन वाट्या, नेटकरी म्हणतात, “हे दोघं… ”

View this post on Instagram

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)

आणखी वाचा – …म्हणून बायकोला सुबोध भावेने रक्ताने लिहिलं पत्र, म्हणाला, “मी सिगारेट ओढत असताना…”

“मी इनोव्हाने प्रवास करत होते. माझा सुरक्षारक्षक पुढे बसला होता. त्याचं डोकं पूर्ण फाटलं. ड्रायव्हरला झोप लागली आणि गाडी एका ट्रकमध्ये घुसली. इनोव्हा ओळखणंही कठीण झालं होतं. पण रात्रीचा प्रवास करु नये. आता मी रात्रीचा प्रवास करणं थांबवलं आहे. माझा पहिला अपघातही असाच झाला. रात्रीचा प्रवास करत असतानाच हा अपघात झाला होता. तेव्हाही मी इनोव्हामध्येच होते. मी स्वामी भक्त आहे. मी स्वामींना खूप मानते. माझी कुलदैवर तुळजाभवानी आहे. गणपती बाप्पा, तुळजाभवानी व स्वामी समर्थ या तीन देवतांमुळेच समाजामध्ये मी छातीठोकपणे वावरत आहे. मला या अपघातानंतर असं वाटलं की, देव आपल्याला खूप संधी देत आहे. कधी कधी लोक आपल्याबरोबर चुकीची असतात त्यांच्यामुळेही हे होऊ शकतं”. या दोन्ही अपघातामुळे मानसीचं आयुष्य पूर्णपणे बदललं.

Tags: entertainment newsmanasi naikmarathi actressmarathi movie
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Vibhu Raghav Death
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्याची कर्करोगाने झालेली अशी अवस्था, आर्थिक मदतीसाठी केलेलं आवाहन, शेवटच्या व्हिडीओत ओळखणंही झालेलं कठीण

जून 4, 2025 | 3:03 pm
Virat kohli connection with premanand maharaj
Entertainment

प्रेमानंद महाराजांच्या आशिर्वादामुळे विराट कोहलीला यश, एका भेटीनंतर गणित बदललं अन्…; सोशल मीडियावर तुफान चर्चा

जून 4, 2025 | 2:20 pm
Sshura Khan Baby Bump
Entertainment

अरबाज खान होणार बाबा, पत्नी शुराचा बेबी बंब पापराजींच्या कॅमेऱ्यात कैद, काळजीपूर्वक पाऊल टाकतानाही दिसली आणि…

जून 4, 2025 | 1:14 pm
avantika malik on divorce with imran khan
Entertainment

“मी आता मरणार असं वाटत होतं आणि…”, इमरान खानच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने सांगितलं घटस्फोटाचं सत्य, हालत अशी की…

जून 4, 2025 | 12:56 pm
Next Post
ss rajamouli on aamir khan acting in laal singh chaddha

"'लाल सिंग चड्डा'मध्ये ओव्हरॲक्टिंग", आमिर खानबाबत राजामौलींचं मोठं वक्तव्य, अभिनेत्याचा भाऊ म्हणतो, "त्याला तेव्हा धक्का बसला अन्…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.