शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध अभिनेत्याची कर्करोगाने झालेली अशी अवस्था, आर्थिक मदतीसाठी केलेलं आवाहन, शेवटच्या व्हिडीओत ओळखणंही झालेलं कठीण

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 4, 2025 | 3:03 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Vibhu Raghav Death

सुप्रसिद्ध अभिनेत्याची कर्करोगाने झालेली अशी अवस्था, आर्थिक मदतीसाठी केलेलं आवाहन, शेवटच्या व्हिडीओत ओळखणंही झालेलं कठीण

Vibhu Raghav Death : ‘निशा और उसके कजिन्स’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या विभू राघव याचे कर्करोगाने निधन झाले. अभिनेत्याच्या निधनाच्या बातमीने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. अभिनेत्याला स्टेज ४ चा कोलन कर्करोग (आतड्यांचा कर्करोग) झाला होता. कर्करोगावरील उपचारादरम्यानच त्याचे निधन झाले आहे. अभिनेता मुंबईतील एका रुग्णालयात उपचार घेत होता. वयाच्या ३७ व्या वर्षी कर्करोगाने अभिनेत्याचे आयुष्य हरपले. विभूने त्याला कर्करोग झाले असल्याचे स्वतःच इंस्टाग्राम पोस्टद्वारे सांगितले होते. अभिनेत्याच्या अकाली जाण्याने चाहत्यांमध्ये आणि कलाकार मंडळींमध्ये दुःखाचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळत आहे. अभिनेत्याच्या अंतिम संस्कारावेळीही अनेक कलाकार मंडळी उपस्थित होती.

विभूच्या अंतिम संस्काराला सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी उपस्थित होते. यावेळी त्याचा जवळचा मित्र अभिनेता मोहित मलिकला अश्रू अनावर झाले. इतकंच नाहीतर त्याने विभूला खांदाही दिला. विभूच्या आजारपणाच्या काळात त्याला अनेक कलाकार मंडळींनी आर्थिक मदतही केली. अनेकांनी तर त्याच्या मदतीसाठी हाकही दिली. विभू या सगळ्यांचे हे उपकार कधीच विसरला नाही. त्याने प्रत्येक वेळी पोस्टमार्फ़त वा व्हिडीओमार्फत अभिनेत्याचे आभार मानले.

आणखी वाचा – कॅन्सरमुळे निधन झालेल्या अभिनेत्याच्या अंतिम संस्काराला कलाकार रडले, सिनेसृष्टीतील जवळच्या मित्राने दिला खांदा, आजारपणातही केली होती आर्थिक मदत

View this post on Instagram

A post shared by VIBHU k RAGHAVE ✨ विभु राघव (@vibhuzinsta)

विभूच्या मृत्यूनंतर त्याच्या इंस्टाग्राम पोस्टवरील शेवटचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये विभू कर्करोगाशी लढतानाचा त्याचा अनुभव शेअर करत आहे. विभू व्हिडीओमध्ये असं बोलताना दिसत आहे की, “नमस्कार मित्रांनो! उपचारांबद्दल अपडेट द्यावं असं वाटलं. डिसेंबरमध्ये पीईटी स्कॅनमध्ये असं दिसून आलं की, कर्करोग यकृतापासून छाती, पाठीचा कणा आणि इतर काही भागांमध्ये पसरला आहे. केमोथेरपीच्या चार फेऱ्यांनंतरही स्कॅनमध्ये कोणतीही सुधारणा दिसून आली नाही; पण आम्ही आशा सोडली नाही. आता एक नवीन उपचार सुरु आहे. फिंगर क्रॉस केले आहे. आणि मला तुमच्या आशीर्वादांची गरज आहे”.

आणखी वाचा – अरबाज खान होणार बाबा, पत्नी शुराचा बेबी बंब पापराजींच्या कॅमेऱ्यात कैद, काळजीपूर्वक पाऊल टाकतानाही दिसली आणि…

या व्हिडीओमध्ये विभूची तब्येत खालावली असल्याचं दिसत आहे. आजारपणाला कंटाळलेल्या विभूच्या चेहऱ्यावरचे हास्य मात्र त्याच्यातील सकारात्मकता दर्शवित आहे. आजार गंभीर असला तरी अभिनेता हा लढा अगदी जोमाने लढताना दिसला. कर्करोगाच्या उपचारामुळे तो प्रचंड बारीक झालेला दिसला शिवाय त्याचे केसही गेलेले दिसले.

Tags: entertainmentvibhu raghavVibhu Raghav death
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Jaya bachchan angry on paparazzi

Video : “निघा इथून, सगळेच घाणेरडे”, फोटोग्राफर्सवर अचानकच भडकल्या जया बच्चन, गाडीमध्ये बसूनही ओरडत राहिल्या अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.