आपल्या नृत्याने प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री व नृत्यांगणा म्हणजे मानसी नाईक. मानसी सध्या कलाक्षेत्रापासून दूर असली तरी सोशल मीडियावर तिचे विविध व्हिडीओ व्हायरल होतान दिसतात. रिल व्हिडीओमध्ये डान्स करत ती प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. शिवाय मानसी सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. ती तिच्या घटस्फोटाच्या प्रकरणामधून बाहेर पडली आहे. पण या कठीण काळात तिला मोठ्या अपघाताला सामोरं जावं लागलं.
भार्गवी चिरमुलेच्या पॉडकास्टमध्ये मानसीने हजेरी लावली होती. यावेळी तिने तिच्या संपूर्ण प्रवासाबाबत भाष्य केलं. तसेच तिच्या खासगी आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. मुलाखतीदरम्यान भार्गवीने तिला तिच्या अपघाताबाबत सांग असं म्हटलं. यावेळी मानसीने तिचा एकदा नव्हे तर दोनवेळा पूर्नजन्म झाला असल्याचं सांगितलं. दोनवेळा मोठ्या अपघातामधून बाहेर पडली असल्याचं मानसीने यावेळी उघड केलं.
मानसी म्हणाली, “माझा खरंतर पुर्नजन्मच आहे. फक्त एकदा नाही दोनवेळा माझा अपघात झाला. सध्या माझं जे काही प्रकरण सुरु आहे (घटस्फोटाचं) त्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर माझा अपघात झाला होता. त्यावेळी माझी संपूर्ण टीमही माझ्याबरोबर होती. एक्सप्रेस हायवेवर जे कोणी काम करणारे होते किंवा वैद्यकीय उपचार करणारे होते ते माझ्यासाठी लगेच धावून आले. माझ्या डोळ्याला लागलं. पण स्वामींची कृपा की मी डोळे बंद केले होते. त्यामुळे मी वाचले. माझ्या टीममधील भारतीला जोरात लागलं होतं. तिचा गाल सुजला होता. रात्रीचा प्रवास खरंच करु नये. कारण ड्रायव्हरला झोप लागते”.
आणखी वाचा – …म्हणून बायकोला सुबोध भावेने रक्ताने लिहिलं पत्र, म्हणाला, “मी सिगारेट ओढत असताना…”
“मी इनोव्हाने प्रवास करत होते. माझा सुरक्षारक्षक पुढे बसला होता. त्याचं डोकं पूर्ण फाटलं. ड्रायव्हरला झोप लागली आणि गाडी एका ट्रकमध्ये घुसली. इनोव्हा ओळखणंही कठीण झालं होतं. पण रात्रीचा प्रवास करु नये. आता मी रात्रीचा प्रवास करणं थांबवलं आहे. माझा पहिला अपघातही असाच झाला. रात्रीचा प्रवास करत असतानाच हा अपघात झाला होता. तेव्हाही मी इनोव्हामध्येच होते. मी स्वामी भक्त आहे. मी स्वामींना खूप मानते. माझी कुलदैवर तुळजाभवानी आहे. गणपती बाप्पा, तुळजाभवानी व स्वामी समर्थ या तीन देवतांमुळेच समाजामध्ये मी छातीठोकपणे वावरत आहे. मला या अपघातानंतर असं वाटलं की, देव आपल्याला खूप संधी देत आहे. कधी कधी लोक आपल्याबरोबर चुकीची असतात त्यांच्यामुळेही हे होऊ शकतं”. या दोन्ही अपघातामुळे मानसीचं आयुष्य पूर्णपणे बदललं.