शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“फक्त चड्ड्या दिसतात आणि…”, नंगानाच म्हणून हिणावणाऱ्याला मराठमोळ्या अभिनेत्रीचं उत्तर, म्हणाली, “बघणाऱ्यांच्या डोळ्यामध्ये…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 12, 2023 | 4:14 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Madhuri pawar troll

“फक्त चड्ड्या दिसतात आणि...”, नंगानाच म्हणून हिणावणाऱ्याला मराठमोळ्या अभिनेत्रीचं उत्तर, म्हणाली, “बघणाऱ्यांच्या डोळ्यामध्ये...”

दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सव महाराष्ट्रामध्ये दणक्यात साजरा करण्यात आला. गोविंदा पथकांनी थर लावत आकर्षक बक्षिसं जिंकली. दरम्यान या दहीहंडी उत्सवामध्ये मराठी कलाकारांचा सहभाग अधिकाधिक पाहायला मिळाला. काही अभिनेत्रींनी दहीहंडी उत्सवामध्ये हजेरी लावत गोविंदांशी संवाद साधला. तर काही अभिनेत्रींनी नृत्य सादर करत उपस्थितांचं मनोरंजन केलं. अभिनेत्री व नृत्यांगणा माधुरी पवारनेही दहीहंडी उत्सवामध्ये नृत्य सादर केलं.

माधुरीने दहीहंडी उत्सवामध्ये नृत्य सादर करतानाचे व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले. या व्हिडीओमध्ये ती धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. माधुरीची एनर्जी पाहून तिच्या चाहत्यांनी तिचं कौतुक केलं. मात्र काहींनी तिचा डान्स पाहून तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. दरम्यान ट्रोलर्सला अगदी सडेतोड उत्तर देत माधुरीने त्यांची बोलती बंद केली.

आणखी वाचा – “टक्कल केलं असतं तर…”, वडिलांच्या मृत्यूनंतर केस न कापण्याबाबत गश्मीर महाजनीचं स्पष्टीकरण, म्हणाला, “जे माझ्यावर…”

View this post on Instagram

A post shared by Madhuri Pawar (@madhuripawarofficial)

माधुरीच्या एका डान्स व्हिडीओवर एका महिला व्यक्तीने कमेंट केली की, “दहीहंडी उत्सवामध्ये बीभत्स नृत्य”. या कमेंटला आणखी एका युजरने रिप्लाय करत म्हटलं की, “नंगा नाच म्हणा सरळ. सध्या महाराष्ट्राचा युपी झाला आहे”. ही कमेंट वाचून माधुरीचा मात्र राग अनावर झाला. यावेळी तिने अगदी सडेतोड शब्दांमध्ये ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलं.

आणखी वाचा – “ये दुनिया बडी जालीम है…”, भाऊ-कुशलची रात्री तीन वाजताच गाडीमध्ये रंगली मैफील, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “आमच्या मैत्रीला…”

ती म्हणाली, “बघणाऱ्यांच्या डोळ्यामध्ये फक्त चड्ड्या दिसत आहेत. डोळे आणि कान नीट उघडे ठेऊन बघितलं तरच कळेल. नाहीतर एकाबरोबर सगळेच तुम्हाला नागडे-उघडे दिसतात. जे आहे त्याला तरी पाठिंबा देण्याची ताकद ठेवा”. माधुरीच्या या मताशी काहींनी सहमती दर्शवली आहे. तर काहींनी “गौतमी पाटीलला नावं ठेऊन स्वतःही तेच करते” म्हणत माधुरीला सुनावलं आहे.

Tags: entertainment newsmarathi actressmarathi serial
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Utkarsh Shinde post fot Harshada Khanvilkar

"ताईमध्ये आई दिसते", हर्षदा खानविलकरबरोबरच्या भेटीनंतर 'बिग बॉस' फेम उत्कर्ष शिंदेची पोस्ट, म्हणाला, "जिच्या पायाला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.