छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमातून लोकप्रिय झालेला अभिनेता आणि गायक उत्कर्ष शिंदे. उत्कर्षने वडील व भाऊ यांच्याप्रमाणे संगीत क्षेत्रात आपलं स्थान निर्माण करत आहे. शिवाय, तो अभिनयात आपले नशीब अजमावताना दिसत आहे. एकीकडे कुटुंबाचे मोठे नाव असताना उत्कर्षने ‘बिग बॉस’च्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख बनवली आहे. त्याचा अभिनय, गायन कौशल्य प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. याचबरोबर आपला दमदार खेळ व युक्तीच्या जोरावर त्याने टॉप ५ पर्यंत मजल मारली होती. पुढे उत्कर्षने अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले असून तो लवकरच एका ऐतिहासिक चित्रपटात सुद्धा दिसणार आहे. (Utkarsh Shinde post fot Harshada Khanvilkar)
उत्कर्ष शिंदे एका डान्स रिऍलिटी शोच्या शूटिंगसाठी निघालेला असता त्याची भेट अभिनेत्री हर्षदा खानविलकरशी झाली होती. यावेळी उत्कर्षने हर्षदाबरोबर एक सेल्फी काढत अभिनेत्रींचे भरभरून कौतुक केले. याबद्दल बोलताना उत्कर्ष म्हणतो, “‘ताईमध्ये आई दिसते’. एका कार्यक्रमाच्या शूटिंगसाठी जिम वर्कआउट आटोपून निघणारच होतो. आणि भेट झाली ती माझ्या आवडत्या व्यक्तीची, आईसारख्या ताईची, हर्षदा खानविलकरची. माझी तोंडभरून स्तुती करणारी, बिगबॉसपासून ते आता तुझी प्रगती पाहून, तुझा हा आत्मविश्वास पाहून खूप छान वाटतं म्हणत कौतुकाचा वर्षाव करणारी माझी ताई. कधीही कुठेही दिसली मग भले ते कार्यक्रम असो की जिम. तिला पाहताच नमन करावं वाटतं.”
हे देखील वाचा – “ये दुनिया बडी जालीम है…”, भाऊ-कुशलची रात्री तीन वाजताच गाडीमध्ये रंगली मैफील, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “आमच्या मैत्रीला…”
“जिच्या पायाला मी स्पर्श करून नमस्कार केल्या-केल्या जी मनभरून आशीर्वाद देते. जिच्यात ‘आभाळमाया’ दिसते, मला ऍक्टिंग करिअरमध्ये मार्गदर्शन करताना ‘पुढचं पाऊल’ कसं टाकावं. ‘कळत-नकळत’ येणारे ‘ऊनपाऊस’ कसे हसत पार करावे, याचे मार्गदर्शन करणारी. वेगळीच ऊर्जा, सकारात्मकता, मला नेहमी जिच्यात दिसते. जिला पाहिलं की मला माझ्या आईची आठवण येते, ती माझी आवडती अभिनेत्री हर्षदा ताई. ती भेटली की, बऱ्याच गोष्टींचं थोडक्यात मार्गदर्शन करत माझ्यात नवा जोश नवी उर्जा भरून जाते. आणि मग काय मी पण ताईचा आशिर्वाद घेऊन तिच्यातली सकारात्मक ऊर्जा घेऊन माझं कार्यक्रमातील डान्सिंग ऍक्ट, शूटिंग दणक्यात करुन आलो.”, असं उत्कर्ष शिंदे म्हणाला. त्याच्या या पोस्टवर हर्षदा खानविलकरने कमेंट केली आहे.
हे देखील वाचा – “फक्त चड्ड्या दिसतात आणि…”, नंगानाच म्हणून हिणावणाऱ्याला मराठमोळ्या अभिनेत्रीचं उत्तर, म्हणाली, “बघणाऱ्यांच्या डोळ्यामध्ये…”
दरम्यान, अभिनेत्री हर्षदा खानविलकरच्या ‘रंग माझा वेगळा’ मालिकेने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. या मालिकेनंतर चाहते तिच्या आगामी प्रोजेक्टची वाट पाहत आहे.