रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“ये दुनिया बडी जालीम है…”, भाऊ-कुशलची रात्री तीन वाजताच गाडीमध्ये रंगली मैफील, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “आमच्या मैत्रीला…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 12, 2023 | 2:11 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kushal Badrike and Bhau Kadam Funny Video

चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाचं पॅकअप झाल्यानंतर रात्री एकत्र घरी जातानाचा एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ यासाठी खास आहे कारण या व्हिडिओमध्ये शेरो शायरीची मैफिल रंगलेली पाहायला मिळतेय.

सिनेसृष्टीत मैत्रीची बरीच उदाहरणे दिली जातात. अशीच एक सध्या लोकप्रिय मित्रांची जोडी म्हणजे चला हवा येऊ द्या कार्यक्रमातील अभिनेता कुशल बद्रिके व अभिनेत्री भाऊ कदम. विनोदी कार्यक्रमाचे हे दोन्ही खरे चेहरे प्रेक्षकांना कायमच भुरळ घालतात. पडद्यावर तर त्यांची मैत्री आपण नेहमीच पाहतो आणि प्रेक्षकांच्या ती पसंतीसही पडते, मात्र पडद्यामागे म्हणजेच खऱ्या आयुष्यातही त्यांची ही मैत्री तितकीच घट्ट असलेली पाहायला मिळते. खऱ्या आयुष्यात या दोन मित्रांचं मैत्रीचं बॉण्डिंग घट्ट असलेलं पाहायला मिळतं. त्यांच्या मैत्रीचा एक व्हिडीओ नुकताच कुशलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. (Kushal Badrike and Bhau Kadam Funny Video)

‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचं पॅकअप झाल्यानंतर रात्री एकत्र घरी जातानाचा एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ यासाठी खास आहे कारण या व्हिडिओमध्ये शेरो शायरीची मैफिल रंगलेली पाहायला मिळतेय. व्हिडिओत असं पाहायला मिळतंय की, भाऊ कदम कुशलला शेर म्हणायला सांगतोय, तेव्हा कुशल शेर म्हणत बोलतो, यावर कुशल गुर्जर साहेबांचा शेर बोलतो, “ये दुनिया बडी जालीम है, हर राज छुपाना पडता है, दिलं में कितना भी गम हो, मैफिल में मुस्कुराना पडता हैं” कुशलने घेतलेला हा शेर ऐकल्यावर भाऊ कदमने समोरच्या टेम्पोवर लिहिलेला हा शेर दाखवला आणि कुशलची पोलखोल केली.

आणखी वाचा – Video : आईच्या आठवणीमध्ये अभिनेता अजिंक्य देव भावुक, म्हणाला, “भरभरुन प्रेम देणारी माय…”

View this post on Instagram

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

कुशलने हा गमतीशीर व्हिडीओ शेअर केला असून, त्याखाली कॅप्शन देत म्हटलं आहे की, “भाऊ कदम आणि मी बऱ्याचदा आमच्या दोघांचीच मैफल रंगते. तशी आमच्या मैत्रीला बरीच वर्ष झाली पण आजही आमचा प्रवास एकत्रच होतो. रात्री तीन, चार वाजता पॅकअप करुन निघाल्यानंतर प्रवासात भाऊ व माझी मैफिल सुरू होते. सोबतीला कधी गुलाम अली साहेब, मेहदी हसन साहेब, कधी पंकज उदास, कधी जगजीत सिंगजी, कधी हरिहरन, कधी लता ताई, कधी साब्री ब्रदर्स अशी असंख्य दिग्गज आमच्या सोबत गाडीत असतात. काल मात्र रात्री साडेचार वाजता “शेरो-शायरी” ची बैठक बसली “वीर गुर्जर” साहेबांसह त्याची ही छोटीशी झलक.

आणखी वाचा – चाहत्याने छत्रपती संभाजी महाराजांबरोबर गश्मीर महाजनीची केली तुलना, अभिनेता म्हणतो, “माझ्यामध्ये त्यांच्या…”

भाऊ कदम व कुशलच्या या व्हिडिओला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. शिवाय अनेक कलाकार मंडळींनी त्यांच्या या व्हिडिओवर हार्ट ईमोजी शेअर केली आहे.

Tags: bhau kadamchala hava yeu dyaentertainmentkushal badrike
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Vishakha Subhedar on netizen's Comment

“आता तरी ‘हास्यजत्रा’मध्ये या”, विशाखा सुभेदारला चाहत्याची विनंती, अभिनेत्री म्हणते, “मी बाजूला झाले कारण…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.