मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. वैयक्तिक आयुष्याबाबतचे अनेक फोटो व व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावरुन शेअर करताना दिसते. शिवाय अनेक विषयांवर ती तिचं परखड मत मांडताना दिसते. कायमच क्रांती तिच्या नवऱ्याबरोबरचे वा तिच्या जुळ्या मुलींबरोबरचे अनेक व्हिडीओ शेअर करत असते. क्रांतीच्या या गमतीशीर व्हिडीओला नेटकरी भरभरुन प्रतिसाद देताना दिसतात. (Kranti Redkar Funny Video With Husband)
अशातच क्रांतीने शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये क्रांती व तिचा नवरा दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये असं दाखविण्यात आलं आहे की, क्रांती तिच्या चाहत्यांना प्रेरणा देण्यासाठी फिटनेसचे धडे देत असते. क्रांती व्हिडीओमध्ये असं बोलताना दिसत आहे की, ” हा व्हिडीओ मी माझ्या त्या चाहत्यांसाठी बनवत आहे ज्यांना माझ्या helathy routine बाबत जाणून घ्यायचं आहे. मी शाकाहारी आहे. मी रोज सकाळी ५ वाजता उठून व्यायाम करते. योगा वगैरे केल्यानंतर मी नाश्ता केल्यानंतर माझ्या रोजच्या कामांना सुरुवात करते. मी नाश्ता आणि दुपारचे जेवण करते आणि शक्यतो रात्रीचे जेवण टाळते”, असं बोलत आहे.
क्रांतीच्या या व्हिडीओमध्ये समीर वानखेडे तिला खोटं बोलताना पाहून चिडलेले दिसत आहेत. सकाळी ५ वाजता उठते असं तिने सांगताच ते संध्याकाळचे ५ असं बोलतात. शिवाय खोटं काहीही बोलू नकोस असा सल्ला देतात. हा गमतीशीर व्हिडीओ पोस्ट करत क्रांतीने “मी खोटं बोलल्यावर माझा नवरा अशी प्रतिक्रिया देतो”, असं म्हणत शेअर केला आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत पसंती दर्शविली आहे.
क्रांतीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, क्रांतीने आजवर तिच्या अभिनय व नृत्य कौशल्याने मराठी सिनेसृष्टीत एक वेगळी छाप उमटवली आहे. एवढंच नव्हे तर तिने दिग्दर्शन क्षेत्रातही एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. क्रांतीच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘रेनबो’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. यापूर्वी तिने ‘काकण’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.