रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : घोडबंदर रोडवरुन शूटला जात असताना मराठी कलाकारांचे हाल, गाड्या दोन-दोन तास एका जागी उभ्या अन्…; अभिनेत्याचा व्हिडीओ चर्चेत

Saurabh Moreby Saurabh More
जून 1, 2024 | 1:48 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actor Abhijeet Khandkekar shared a video of traffic jam on Thane-Ghodbunder road

Video : घोडबंदर रोडवरुन शूटला जात असताना मराठी कलाकारांचे हाल, गाड्या दोन-दोन तास एका जागी उभ्या अन्...; अभिनेत्याचा व्हिडीओ चर्चेत

गुजरातला जाण्यासाठी महत्त्वाच्या मार्गांपैकी एक असलेला घोडबंदर रोड दुरुस्तीच्या कामानिमित्त बंद आहे. घोडबंदर रोडवरील गायमुख घाटातील ७०० मीटर लांबीच्या रस्त्याची दुरुस्ती केली जणार आहे. या रस्त्याचं डांबरीकरण करण्याचं काम २४ मे पासून सुरु असून या कामानिमित्त प्रचंड वाहतूक कोंडी होतं आहे. त्यामुळे ठाणेवरुन मुंबईला व गुजरातवरुन महाराष्ट्रात येणाऱ्या येणाऱ्या अनेकांना या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. सामान्य जनतेसह अनेक कलाकार मंडळींनादेखील या वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

कामानिमित्त अनेक नागरिक मुंबई-ठाणे असा प्रवास करत असतात. तसेच अनेक मराठी मालिकाविश्वातील अनेक कलाकारही ठाणे ते मुंबई असा प्रवास करत असतात. त्यामुळे अनेकजण ठाणे-घोडबंदर या मार्गाचा वापर करतात. मात्र या मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे अनेकजण त्रस्त झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे मध्य रेल्वेच्या कामामुळे लोकल ट्रेन्सच्या त्रासाने नागरिक त्रस्त आहेत तर दुसरीकडे या ठाणे-घोडबंदर रोडवरील ट्रॅफिकमुळेही अनेकांना वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

आणखी वाचा – कुठे गायब झाली ‘तारक मेहता…’मधील अंजली भाभी?, आता फक्त देवभक्तीमध्ये आहे तल्लीन, नेमकं कसं जगत आहे आयुष्य?

अशातच अभिजीत खांडकेकरनेही या वाहतूक कोंडीच्या व्हिडीओ शेअर केला आहे. अभिजीतने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये वाहनांची प्रचंड मोठी रांग लागली असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच अभिनेत्याने उपरोधिकपणे “Ohh I love Ghodbandar” (घोडबंदर माझं तुझ्यावर प्रेम आहे) असं म्हटलं आहे. अभिजीतने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओद्वारे ठाणे-घोडबंदरमधील सध्याच्या वाहतूक कोंडीची भीषणता पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – देवीआईच्या मंदिराजवळून दरीत पडलेला विरोचक पुन्हा परतणार, राजाध्यक्षांच्या घरी ऐकू आली किंचाळी, नेमका वध कधी होणार?

दरम्यान, काल (३१ मे) रोजी अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनाही या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला असून याबद्दलचा एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी सर्वांना गरज नसल्यास प्रवास न करण्याचे आवाहन केले होते. तर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री नम्रता संभेराव व चेतना भट यांनीही त्यांचा या ट्रॅफिकमधील एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये दोघी ट्रॅफिकने त्रस्त झाल्यामुळे विरंगुळा म्हणून मोबाईलवर टाइमपास करत असल्याचे पाहायला मिळाले.

Tags: abhijeet khandkekarmarathi actormarathi entertainment newsThane Ghodbunder Road Traffic
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Aarti Solanki On Fitness

१३२ किलोवरुन थेट वजन झालं ७१ किलो, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा बदलता लूक पाहून चाहत्यांनाही धक्का, आता दिसते अशी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.